घरात घुसुन अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपीला अटक

पुणे : पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. घरात एकटी असताना गतीमंद असलेल्या १४ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी एकाला अटक केली आहे. शफिक शौकत अन्सारी (वय ४२, रा. नाईकनवरे सोसायटी, ससाणेनगर, हडपसर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला हडपसर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. याबाबत एका ५५ वर्षाच्या आजीने हडपसर पोलिसांकडे तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांची १४ वर्षाची नात एकटीच घरी होती. तिची समजशक्ती कमी आहे. असे असताना शफिक अन्सारी हा घरात शिरला. त्याने घराच्या दाराची कडी आतून लावून घेतली. १४ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला. हडपसर पोलिसांनी आरोपी अन्सारीला अटक केली आहे.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




