रानडुकराची शिकार करून मांस वाहतूक करणाऱ्या 5 जणांना अटक; वन विभागाची कारवाई

पुणे – रानडुकराची शिकार करून त्याच्या मांसाची वाहतूक करणाऱ्या पाच जणांना वन विभागाने अटक केली. मांस आणि मोटार असा एकूण सहा लाखांचा ऐवज त्यांनी जप्त केला. वडगाव मावळ वन विभागाने जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर वडगावजवळ ही कारवाई केली.
मारुती शितोळे, सत्यवान भोईर (दोघेही रा. कासारसाई ता. मुळशी), दत्ता वाघमारे, संजय वाघमारे, सीताराम जाधव (तिघेही रा. कडधे मावळ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
ही कारवाई मुख्य वनसंरक्षक एन. आर. प्रवीण, उपवनसंरक्षक महादेव मोहिते, सहाय्यक वनसंरक्षक अतुल जैनक यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिक्षेत्र अधिकारी वडगाव मावळ एस.डी. वरक, वन परिमंडळ अधिकारी मल्लिनाथ हिरेमठ, वनपाल देवले, दया डोमे, वनरक्षक परमेश्वर कासुळे, वनरक्षक योगेश कोकाटे, वनरक्षक एस. के. मोरे, वनरक्षक कृष्णा देठे, वनरक्षक दीपक उबाळे व वनसेवक जांभूळकर यांच्या पथकाने केली.
जुना पुणे-मुंबई महामार्गावर न्यू इंग्लिश स्कूल शाळेजवळ एका मोटारीत रानडुक्कराचे मांस अवैधरीत्या शिकार करून वाहतूक करत असल्याची माहिती वन विभागाला मिळाली. त्यानंतर, वडगाव मावळ वन विभागाने कारवाई करत पाच जणांना ताब्यात घेतले. त्यांच्या विरोधात भारतीय वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




