कारच्या धडकेत सफाई कामगार महिलेचा मृत्यू; खराडी भागातील धक्कादायक घटना

पुणे : कारच्या धडकेत पदपथावरील गवत काढणाऱ्या सफाई कामगार महिलेचा मृत्यू झाल्याची घटना मुंढवा खराडी रस्त्यावर घडली आहे. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी कार चालकाला अटक केली आहे. राजेंद्र ज्ञानोबा धुमाळ (५२, रा. रायकर मळा, धायरी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. तर, छाया मंगेश पेढारकर (३९, रा. खराडी) असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत ज्योती लोखंडे (३७, रा. हडपसर) यांनी तक्रार दिली आहे. सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास मुंढवा पुलाकडून खराडी गावाकडे येणाऱ्या रस्त्यावर ही घटना घडली.

Advertisement

पोलिसांच्या माहितीनूसार, तक्रारदार महापालिकेत कंत्राटी पदावर सफाई कर्मचारी म्हणून काम करतात. सोमवारी सकाळी त्या त्यांच्या सहकारी छाया यांच्यासह खराडी येथील रस्त्यावर गवत काढण्याचे काम करीत होत्या. तेव्हा भरधाव कारने छाया यांना धडक दिली. त्यात गंभीर जखमी झालेल्या छाया यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच चंदननगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घेतली. पोलिसांनी कारचालक धूमाळ यांना अटक केली असून चंदननगर पोलीस पुढील तपास करत आहेत.

संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page