पुणेकरांसाठी महत्वाची बातमी; गणेश विसर्जन मिरवणुकीनिमित्त शहरातील हे रस्ते वाहतुकीस बंद

पुणे : वैभवशाली परंपरा असलेल्या विसर्जन मिरवणुकीनिमित्त शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत. मध्यभागातील प्रमुख १७ रस्ते वाहतुकीस बंद राहणार आहेत. मिरवणुकीची सांगता झाल्यानंतर प्रमुख रस्ते वाहतुकीस खुले करून देण्यात येणार आहेत. पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात मंगळवारी सकाळी सुरु होणार आहे. त्यामुळे मिरवणूक सुरू होण्यापूर्वी पुण्यातील मध्यवर्ती भागातील लक्ष्मी रस्ता, छत्रपती शिवाजी रस्ता, टिळक रस्ता, शास्त्री रस्ता, केळकर रस्ता, बाजीराव रस्ता, कुमठेकर रस्ता, गणेश रस्ता, जंगली महाराज रस्ता, कर्वे रस्ता, फर्ग्युसन रस्ता, भांडारकर रस्ता, पुणे-सातारा रस्ता, सोलापूर रस्ता, प्रभात रस्ता, बगाडे रस्ता, गुरू नानक या रस्त्यांवरील वाहतूक विसर्जन मिरवणुकीची सांगता होईपर्यंत बंद राहणार आहे.
संपुर्ण शहरात अवजड वाहनांना बंदी
गणेश विसर्जन मिरवणूकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (दि.१७) रात्री १२ ते बुधवारी (दि.१८) रात्री बारापर्यंत एकूण ४८ तास संपुर्ण शहरामध्ये सर्व प्रकारच्या जड वाहनांना प्रवेशबंदी केली आहे.
पर्यायी मार्ग कोणते?
विसर्जन मिरवणूकवेळी बंद केलेल्या रस्त्याकरीता पर्यायी मार्ग रिंग रोड तयार केला आहे. कर्वे रोड-नळस्टॉप चौक- लॉ कॉलेज रोड- सेनापती बापट रोड जंक्शन -गणेशखिंड रोड सिमला ऑफिस चौक -संचेती हॉस्पीटल चौक -इंजि. कॉलेज चौक -आंबेडकर रोडवरील शाहिर अमर शेख चौक- मालधक्का चौक- बोल्हाई चौक -नरपतगिरी चौक -नेहरु रोडवरुन संतकबीर पोलीस चौकी -सेव्हन लव्हज चौक -वखार महामंडळ चौक-शिवनेरी रोडवरुन गुलटेकडी मार्केटयार्ड -मार्केटयार्ड जंक्शन सातारा रोड ते व्होल्गा चौक (लक्ष्मीनारायण सिनेमा) -सिंहगड रोडने मित्रमंडळ चौक- सावरकर चौक सिंहगड रोड जंक्शन -लाल बहादुर शास्त्री रोडने सेनादत्त पोलीस चौकी,- अनंत कान्हेरे पथावरुन म्हात्रे पुल ते नळस्टॉप या मार्गाचा वापर करावा.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




