दैनिक युवक आधारचा प्रथम वर्धापनदिन सोहळा थाटात संपन्न

पनवेल : वर्षभरापूर्वी दैनिक युवक आधारने पनवेल शहरामध्ये दिमाखात पाऊल ठेवले होते. दर्जेदार बातम्या व लेख यामुळे वाचकांच्या पसंतीस हे वर्तमानपत्र पडले आहे. अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेला दैनिक युवक आधार या दैनिकाचा प्रथम वर्धापनदिन सोहळा जय महाराष्ट्र न्यूज चॅनेलचे संपादक प्रसाद काथे व न्यूज १८ लोकमतचे सहसंपादक विलास बडे, रुषिकेश राजकिरण, प्रसिद्ध अभिनेता नंदकुमार जाधव, अध्यक्ष डॉ. ना. म. जाधव फाउंडेशन पनवेल, प्रशांत सागवेकर वृत्त निवेदक जय महाराष्ट्र न्यूज चॅनेल, दैनिक युवा का आधारच्या संपादक भारती संतोष आमले यांच्या उपस्थितीत मोठ्या थाटामाटात संपन्न झाला.

कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. ना. म. जाधव फाउंडेशन पनवेल यांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठवाडा विभाग संपादक जगन्नाथ रासवे यांनी केले.

या कार्यक्रमात जय महाराष्ट्र न्यूज चॅनेनचे वृत्तनिवेदक प्रशांत सागवेकर यांनी घेतलेली मुलाखत, जय महाराष्ट्र न्यूज चॅनेलच् संपादक प्रसाद काथे, आणि न्यूज १८ लोकमतचे सहसंपादक विलास बडे यांची घेतलेली मुलाखत आकर्षण ठरली. नवोदित पत्रकारांना या मुलाखतीद्वारे संबोधित करण्यात आले.

Advertisement

या मुलाखतीद्वारे पत्रकार क्षेत्रातील नवोदित पत्रकारांनी कोणते नियम पाळावेत, कशी पद्धतीची पत्रकारिता करावी, याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी जय महाराष्ट्र न्यूज चॅनेलचे संपादक प्रसाद काथे यांनी सामाजिक भान ठेवून समाज हिताची पत्रकारिता करावी, असा मोलाचा संदेश दिला.

नियोजित पत्रकारांना मार्गदर्शन करत अनेक विषयांवर या मुलाखतीमध्ये चर्चा करण्यात आली. या कार्यक्रमासाठी नागपूर, यवतमाळ, बुलढाणा, जालना, बीड, अहमदनगर, मुंबई व इतर विभागातून दैनिक युवक आधारचे प्रतिनिधी उपस्थित होते. सर्व दैनिक युवक आधारच्या प्रतिनिधींना स्मृतीचिन्ह प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर, तसेच वकिल, जाहिरातदार प्रतिनिधी, इतर माध्यमाचे प्रतिनिधी, या सर्वांनी उपस्थित राहून दैनिक युवक आधारला वर्धापनदिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. सर्व उपस्थितांचे आभार शेवटी संतोष आमले यांनी मानले.

रिपोर्टर – आरतीताई बाबर (दैनिक युवक आधार)

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page