सांगलीत जिम चालकाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

सांगली : राज्यात महिला व अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. आता सांगली जिल्ह्यातील अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना समोर आली आहे. सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथे अल्पवयीन मुलीवर जिमचालक तरुणाने लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर समोर आला आहे.
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपाला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी आज नागरिकांनी आटपाडी पोलीस ठाण्यासमोरच ठिय्या मांडला. आरोपीला या गुन्ह्यात मदत करणाऱ्याला देखील शिक्षा व्हावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. पोलिसांनी या दोन्ही आरोपींना अटक केली आहे. सध्या दोन्ही आरोपी हे कोठडीत आहेत.
आटपाडी येथे जिम चालवत असलेल्या एका तरुणाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला आहे. याबाबत पोलिसांनी त्या आरोपीला अटक केली आहे. आरोपींविरोधात पॉक्सो कायद्यांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने अशाच प्रकारे आणखी काही मुलींवर अत्याचार केल्याचा आरोप होत आहे. याबाबत देखील आटपाडी पोलीस अधिक तपास करत आहेत.
पीडित मुलीला न्याय मिळावा तसेच आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी नागरिकांनी बसस्थानकापासून आटपाडी पोलीस ठाण्यापर्यंत मोर्चा काढला. हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चावलावे. तसेच या प्रकरणात सरकारी वकील देखील देण्यात यावा अशी मागणी या मोर्चाच्या माध्यमातून नागरिकांनी केली आहे. आरोपीने पीडित मुलीच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला जात आहे. आरोपीच्या वैध धंद्यांची चौकशी व्हावी आणि पीडित मुलीसह तिच्या कुटुंबाला संरक्षण मिळावे असा मागण्या यावेळी करण्यात आल्या.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




