धुळ्यात एकाच कुटुंबातील 4 जणांची आत्महत्या; पती-पत्नीसह दोन मुलांनी संपवले जीवन

धुळे : धुळे शहरातील देवपूर भागातील प्रमोद नगरात एकाच कुटुंबातील आई- वडील आणि दोघा मुलांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज उघडकीस आली. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून घटनेमुळे परिसरातील नागरिक मात्र सुन्न झाले आहेत. आत्महत्या मागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी या कुटूंबाने एवढे टाकाचे पाऊस का उचलले असावे, असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे.
धुळ्यातील गिरासे कुटुंबातील दोन मुलांसह पती-पत्नीने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. मुलाच्या अॅडमिशनसाठी मुंबईला जात असल्याचं शेजारच्यांना खोटं सांगितलं असल्याचं सांगण्यात येत आहे. प्रवीण मानसिंग गिरासे, गीता प्रवीण गिरासे आणि मुलं मितेश प्रवीण गिरासे, सोहम प्रवीण गिरासे असं मृतांची नावं आहेत. धुळे पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




