मनसे कार्यकर्ते जय मालोकार यांच्या मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण; पोस्टमार्टम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती समोर

अकोला : अकोल्यातील मनसे कार्यकर्ते जय मालोकार यांच्या मृत्यू प्रकरणाला आता वेगळे वळण आलयं. जय मालोकार यांच्या पोस्ट मॉर्टम रिपोर्टमधून धक्कादायक बाब समोर आलीय. जय मालोकारचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने नाही तर जबर मारहाणीनं झाल्याचं समोर आलंय. पोस्ट मॉर्टम रिपोर्टनुसार,मालोकार यांच्या अंगावर महत्त्वाच्या अवयवांना अनेक दुखापत झाल्या होत्या. या जखमांमुळे जय मालोकार याचा मृत्यू झाल्याची शक्यता वैद्यकीय अहवालात वर्तवण्यात आलीय.

Advertisement

दोन महिन्यांपूर्वी राज ठाकरेंनी अजित पवारांवर केलेल्या विधानावर मिटकरींनी टीका केल्यामुळे अकोल्यात मनसेनं मिटकरींची गाडी फोडली. त्यावेळी मनसे समर्थक आणि वैद्यकीय शिक्षण घेणारा तरुण जय मालोकार बाजूला उभा होता. तोडफोडीच्या काही वेळेतच मालोकारचा अटॅकमुळे मृत्यू झाल्याचं सांगितलं गेलं. मात्र त्यावेळी मनसेनंच मालोकारला मारहाण केल्याचा आरोप अमोल मिटकरींनी केला होता. दुसरीकडे तोडफोड प्रकरणात गुन्हे दाखल झाल्यानंतर मनसेचे पदाधिकारी फरार झाले होते. त्याच प्रकरणाला आता नवीन वळण मिळालंय.

काय म्हटलं आहे जय मालोकारच्या शवविच्छेदन अहवालात?

जयला जबर मारहाण झाली. पाठीवर छातीवर डोक्यावर आणि मानेवर जबर मारहाण. छातीच्या चार ते पाच बरगड्या मागच्या बाजूने फ्रॅक्चर आहेत. डोक्याला सुद्धा गंभीर मारहाण झाली आहे. पोस्टमार्टमवेळी मेंदूवर मोठ्या प्रमाणात सूज. त्यामुळे मेंदूचे वजन वाढलं. मानेवर जबर मारहाणीमुळे त्याच्या मज्जातंतूना गंभीर इजा, या सर्व गोष्टींमुळे ‘न्यूरोजनिक शॉक’मुळे मृत्यू झाला.

संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page