नितीन गडकरींचं PM पदाबाबत सर्वात मोठं विधान, म्हणाले…

देशात पंतप्रधान पदावरून नितीन गडकरींच्या नावाची नेहमीच चर्चा होते. या दरम्यान आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मोठं विधान केले आहे. ‘लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याने त्यांना पंतप्रधानपदाची ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोट गडकरी यांनी केला आहे. मात्र त्यांनी ती ऑफर नाकारली असल्याचे ते म्हणाले आहेत.
गडकरी म्हणाले, ‘एका ज्येष्ठ विरोधी पक्षनेत्याने मला पंतप्रधानपदाचा प्रस्ताव दिला होता. तेव्हा मी त्या नेत्याला सांगितले की, मी एक विचारधारा मानणारा आहे. मी अशा पक्षात आहे, ज्याने मला सर्व दिले आहे ज्याची मी कल्पनाही केली नव्हती. कोणतीही ऑफर मला मोहात पाडू शकत नाही’. मात्र, गडकरींनी त्या विरोधी पक्षनेत्याचे नाव किंवा पक्षाची ओळख उघड केले नाही. दरम्यान, आता तो विरोधी नेता कोण याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्याने विरोधकांची पंचाईत झाली आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीत भाजपला पूर्ण बहुमत मिळालेलं नाही. लोकसभा निवडणुकीत भाजपने 240 जागा जिंकल्या आहेत. तर डीटीपी आणि जेडीयू सारख्या पक्षांच्या मदतीने आघाडी सरकार स्थापन करावे लागले. 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला एकहाती बहुमत मिळाले होते.त्यावेळी विरोधकांनी इंडिया आघाडीची स्थापना केली. त्यांनी एकत्रितपणे देशभरात निवडणुका लढवल्या. याचा परिणाम असा झाला की, एनडीएसाठी 400 चा आकडा पार करण्याचा दावा करणारा भाजप बहुमताच्या आकड्यापासून दूर राहिला. मात्र नरेंद्र मोदी पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले. नितीन गडकरी हे सलग तिसऱ्यांदा भाजप सरकारमध्ये केंद्रीय मंत्रीही झाले आहेत.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




