येरवडा येथे शिवसेनेच्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन..!!

येरवडा येथे शिवसेनेच्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन..!!
आज येरवडा परिसरात शिवसेनेच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन माझ्या हस्ते पार पडले.
या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून लोकांच्या अडचणी, प्रश्न, आणि गरजांशी थेट जोडणारा एक जीवंत दुवा आहे जो शिवसेना नेते व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते मा.एकनाथ शिंदे साहेब यांच्या लोकाभिमुख कार्यपद्धती आणि समाजसेवेच्या कार्याचा पुढचा अध्याय आहे.
शिवसेनेचे निष्ठावान कार्यकर्ते रवी अग्रवाल यांच्या पुढाकारातून हे कार्यालय सुरू झाले असून, त्यांच्या सामाजिक कार्याचा लाभ आजवर शेकडो कुटुंबांना झाला आहे. आता हे जनसंपर्क कार्यालय त्यांच्या सेवेला अधिक ठोस आणि प्रभावी स्वरूप देईल.
याच दिवशी, माझ्या वाढदिवसानिमित्त मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.
शिबिरामध्ये सर्वसामान्यांसाठी आरोग्य तपासणी,दंतचिकित्सा,मधुमेह आणि रक्तदाब तपासणी,डोळ्यांची तपासणी, चष्मे वाटप,मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेची नोंदणी अशा उपयुक्त सेवांचा समावेश होता.
या उपक्रमातून शेकडो नागरिकांना प्रत्यक्ष लाभ मिळाला, आणि येरवडा परिसरात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली.
तसेच बापू खरात यांच्या समवेत बुद्ध विहार येथे भेट देऊन अध्यात्मिक शांततेचा आणि सामाजिक समतेचा संदेश दिला.
एकनाथ शिंदे साहेबांच्या कार्याची प्रेरणा घेऊन, शिवसेनेचा सेवाभाव येरवडा परिसरात आणखी मजबूत होईल, याची मला खात्री आहे
यावेळी उपशहर प्रमुख सुनील जाधव, शिवसैनिक आनंद गोयल विभाग प्रमुख बापू खरात, सुहास कांबळे, रवी अग्रवाल व असंख्य शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते.




