मुंबईत महाविकास आघाडीचे जोडे मारा आंदोलन; पोलिसांचा चोख बंदोबस्त

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनावरण केलेला छत्रपती शिवरायांचा पुतळा 26 सप्टेंबरला कोसळला अन् महाराष्ट्रभरात संतापाची लाट पाहायला मिळत आहे. पण उद्घाटनानंतर केवळ आठच महिन्यात हा पुतळा कोसळला. त्यानंतर महाराष्ट्रभरातून संतप्त प्रतिक्रिया समोर आल्या. महाविकास आघाडीकडून या घटनेच्या निषेधार्थ हा मोर्चा ‘जोडे मारो’ आंदोलन केलं जात आहे.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात आंदोलन केलं जात आहे. महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आणि तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांच्या नेतृत्वात मुंबईत ‘जोडे मारो’ आंदोलन केलं जात आहे. मुंबईतील हुतात्मा चौक ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत हा मोर्चा सुरु आहे. शरद पवार आणि छत्रपती शाहू महाराज हे काही वेळ मोर्चामध्ये चालले. त्यानंतर गाडीतून हे दोघे गेट वे ऑफ इंडियाकडे रवाना झाले आहेत. गेट वे ऑफ इंडिया परिसरात असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करत मोर्चा संपेन. यावेळी महाविकास आघाडीचे नेते संबोधित करतील.
आधी या मोर्चाला पोलिसांनी परवानगी दिली नव्हती. मात्र आज रविवारचा दिवस आहे. या भागातील कार्यालयांना सुट्टी आहे. असं असताना आमच्या आंदोलनाला परवानगी का नाही? असा सवाल महाविकास आघाडीने केला. त्यानंतर हा मोर्चा अडवला जाणार नाही, अशी भूमिका पोलिसांनी घेतली. लावलेले बॅरिगेटही हटवण्यात आले आहेत. हा मोर्चा आता गेट वे ऑफ इंडियाच्या दिशेने रवाना झाला आहे.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




