खडक पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध धंदे आणि गांजा विक्रीचा शुकशुकाट! प्रशासन कोणती भूमिका घेणार?

पुणे – खडक पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध धंद्यांसह गांजा विक्रीचा व्यवसाय तेजीत सुरू असल्याचे उघड झाले आहे. विशेषतः एका मारुती मंदिराजवळ गांजा खुलेआम विकला जात असल्याची चर्चा होती. मी मराठी क्रांतीच्या प्रतिनिधींनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन या गोष्टीची खातरजमा केली असता धक्कादायक माहिती समोर आली
प्रत्यक्ष पाहणीदरम्यान उघडकीस आलेले धक्कादायक प्रकार
गुप्त माहितीच्या आधारे मी मराठी क्रांतीच्या पत्रकारांनी त्या ठिकाणी गांजा विक्री सुरू असल्याची पडताळणी करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी गांजा विक्री करणाऱ्या व्यक्तींशी संपर्क साधताच तिथे मोठ्या प्रमाणावर गांजा विक्रीचे साहित्य असल्याचे आढळून आले. मात्र, पत्रकारांच्या हालचालींवर संशय आल्यावर विक्रेत्यांनी तिथून पळ काढला.
पोलीस प्रशासनाची भूमिका संशयास्पद?
या परिसरात गांजा विक्रीचा व्यवसाय सर्रास सुरू असूनही पोलीस प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याने स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. “पोलीस यावर कारवाई का करत नाहीत?” असा सवाल नागरिक करत आहेत. विशेषतः युवक आणि विद्यार्थीवर्ग या व्यसनाच्या विळख्यात अडकण्याची भीती निर्माण झाली आहे.
पोलीस प्रशासनाकडून कोणती कारवाई होणार?
या गंभीर विषयावर खडक पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांची भूमिका काय असेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. गांजा विक्री आणि अवैध धंद्यांविरोधात तातडीने कारवाई न झाल्यास याचा मोठा सामाजिक परिणाम होऊ शकतो.
मी मराठी क्रांतीच्या माध्यमातून आम्ही यावर पुढील
अपडेट्स देत राहू. प्रशासनाची भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे!




