एन.डी.पी.एस. अन्वये कारवाई करुन ०२,०२,८००/-रु.किं.चा मुद्देमाल केला जप्त..!

दि.२७/११/२०२५ रोजी गुन्हे शाखा युनिट २ कडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार असे गुन्हे शाखा युनिट-२ हद्दीत गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलींग व रेकार्डवरील गुन्हेगार चेक करीत असताना पोलीस अंमलदार विशाल दळवी यांना गोपनिय माहिती मिळाली की, एक इसम गुरुव्दारा रोड, जनरल बेऊर चौकाजवळ, सार्वजनिक रोडवर मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ जवळ बाळगून थांबलेला आहे.

नमुद अंमलदार यांनी मिळालेली माहिती गुन्हे शाखा युनिट २ प्रभारी पोलीस निरीक्षक श्री.संतोष सोनवणे यांना कळविली असता त्यांनी सहा. पोलीस निरीक्षक अमोल रसाळ व युनिट २ पथकास कायदेशीर कारवाई करणेबाबत आदेशीत केले. त्याप्रमाणे युनिट-२ कडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी नमुद ठिकाणी जावून पाहणी केली असता एक इसम सदर ठिकाणी संशयितरित्या थांबलेला मिळुन आला. सदर इसमास ताब्यात घेवुन त्यास नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव आयाज आशरत खान, वय ५४ वर्षे, रा. दस्तूर मेहर रस्ता, दोराबजी हॉटेलजवळ ९७५ कॅम्प पुणे असे असल्याचे सांगितले. त्याची अंगझडती घेतली असता त्याचे ताब्यात १,१२,८००/-रु.कि.चा. ०५ ग्रॅम ६४ मिलीग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ, २०,०००/-रु.किं.चा मोबाईल फोन, ७०,०००/-रु. किं.ची एक मोटरसायकल असा ऐवज एकुण २,०२,८००/-रु.किं.चा ऐवज मिळुन आला.

Advertisement

सदर इसमाविरुध्द बेकायदेशिररित्या मेफेड्रॉन एम.डी हा अंमली पदार्थ जवळ बाळगल्याने लष्कर पोलीस स्टेशन पुणे येथे गु.र.नं. २०८/२०२५ एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २२ (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी मा.अपर पोलीस आयुक्त गुन्हे पुणे शहर श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप-आयुक्त गुन्हे पुणे शहर श्री. निखील पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे-१ पुणे शहर श्री. विजय कुंभार यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संतोष सोनवणे यांचे सुचनांप्रमाणे सहा. पोलीस निरी. आशिष कवठेकर, सहा. पोलीस निरी. अमोल रसाळ, पोलीस अंमलदार संजय जाधव, विशाल दळवी, उज्वल मोकाशी, योगेश माढरे, शंकर नेवसे, साधना ताम्हाणे, शंकर कुंभार, नागनाथ राख, विजयकुमार पवार, सद्दाम तांबोळी, आजीम शेख,, गणेश थोरात, प्रविण उत्तेकर व विनायक वगारे यांनी केली आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page