महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट; जाणून घ्या आजचा हवामान विभागाचा अंदाज

पुणे : सध्या राज्यात पावसाचा जोर कमी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मात्र, काही भागात जोरदार पाऊस कोसळताना दिसत आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आजही राज्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकणासह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आज राज्याच्या विविध भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. आज कोकणासह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. आज कोकणातील रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यात देखील पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्याचबरोबर विदर्भातील अमरावती, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचरोली आणि वर्धा या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळं याभागात आज जोरदार पावसाची शक्यता आहे.
तर दुसरीकडे भारतीय हवामान विभागाने गुजरातमध्ये पुढील दोन दिवस मुसळधार पावसाबाबत रेड अलर्ट जारी केला आहे. बुधवारी पश्चिम राजस्थान आणि अंदमान निकोबार बेटांवर आणि गुरुवारी पश्चिम राजस्थान, केरळ आणि ओडिशामध्ये पावसाबाबत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. जम्मू- काश्मीरसह उत्तर-पश्चिम ते पश्चिम, मध्य आणि ईशान्य भारतात मुसळधार पाऊस पडत आहे. जवळपास संपूर्ण गुजरात आणि पश्चिम राजस्थान महापुराचा सामना करत आहे.
जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर




