कौटुंबिक वादातून पतीने पत्नीचा गळा दाबला अन्…; पुण्यातील धक्कादायक प्रकार

पुणे : पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे, अशातच आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कौटुंबिक वादातून पत्नीचा गळा दाबून तिच्या खूनाचा प्रयत्न केल्याची घटना पद्मावती परिसरात घडली. गळा दाबल्याने पत्नी बेशुद्ध पडली. तेव्हा ती मयत झाल्याचा भास पतीला झाला अन् त्याने घराला बाहेरून कुलूप लावून पळ काढला.

याप्रकरणी पती सत्यवान अनिल मोहिते (वय २६, रा. इंदापुर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत २४ वर्षीय पत्नीने सहकारनगर पोलिसांत तक्रार दिली आहे.

Advertisement

दोघांचा काहीच महिन्यांपुर्वी विवाह झाला आहे. दरम्यान, त्यांच्यात कौटुंबिक कारणातून वाद होत असत. दरम्यान, दोन दिवसांपुर्वी देखील त्यांच्यात काही कारणावरून वाद झाला. वादाचे रुपांतर कडाक्याच्या भांडणात झाले. तेव्हा सत्यवान याने तक्रारदारांना मारहाण केली. तसेच, त्या बाहेर जात असताना त्यांचा गळा दाबला. त्यांना खाली पाडून पुन्हा दोन्ही हाताने ठार मारण्याच्या उद्देशाने गळा दाबला. त्यात तक्रारदार या बेशुद्ध पडल्या. त्या निपचित पडल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने घराला बाहेरून कडी लावून पळ काढला असल्याचे तक्रारीत म्हंटले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page