आय.आय.टी. मुंबई येथील प्रकल्प देण्याच्या बहाण्याने पुण्यातील एका शिक्षण संस्थेची २,४६,००,०००/- रुपयांची अर्थिक फसवणुक करणा-या इसमास हैद्राबाद येथून केले जेरबंद..!

सायबर पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे दाखल असलेला गुन्हा रजि. नं ९६/२०२५, भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१९(२), ३१८ (४), ३१६ (५) सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६ (सी), ६६ (डी) या दाखल गुन्ह्यामध्ये Bombay IIT येथील प्रतिष्ठीत प्रोफेसरचे नाव वापरुन शासनाचे AI व Drone प्रकल्प देण्याच्या बहाण्याने फिर्यादी यांचा विश्वास संपादन करुन त्यांना वारंवार मेल व व्हॉट्सअॅप कॉलव्दारे त्यांची दिशाभूल करुन त्यांना पैसे भरण्यास भाग पाडुन फिर्यादी प्रोफेसर असलेल्या पुण्याच्या नामांकीत Engg. College ची एकूण २,४६,००,०००/- रुपयेची आर्थिक फसवणुक केली म्हणुन सदरचा गुन्हा दिनांक ०६/०९/२०२५ रोजी दाखल करण्यात आला आहे.

दाखल गुन्ह्याचे तपासी अधिकारी वपोनि स्वप्नाली शिंदे यांनी दाखल गुन्ह्याचा सखोल तपास केला तसेच गुन्ह्यातील मिळुन आलेल्या माहितीचे तांत्रिक विश्लेषणद्वारे यातील फिर्यादी यांच्या विद्यापीठाची एकूण २,४६,००,०००/- रू रकमेची आर्थिक फसवणूक करणा-या व्यक्तीचे नाव हे Bombay IIT येथील प्रोफेसरचे नसून ते सितैया किलारु, वय ३४ वर्षे, रा. मेहेर रोड, याप्रल, हैद्राबाद तेलंगणा (Seetaiah Kilaru, Address Meherr Road, yepral, Hydrabad Telangana) असे असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर नमुद गुन्ह्यातील आरोपीतास ताब्यात घेण्यासाठी दि. १८/०९/२०२५ रोजी वपोनि स्वप्नाली शिंदे व सायबर पोलीस पथक हैद्राबाद येथे रवाना झाले. हैद्राबाद येथे गुन्ह्याचे तपासात वर नमुद आरोपीतास दि.२१/०९/२०२५ रोजी आरोपीताचा शोध घेणेकरीता साई नगर, प्रगती नगर, निजामपेठ, गच्चीबावली, याप्रल याठिकाणी कसोशीने शोध घेतला असता तो याप्रल, हैद्राबाद येथे असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यावर सापळा रचून त्यास शिताफिने पकडून ताब्यात घेतले. त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस करता तो स्वतः गुन्ह्याचा Mastermind असल्याचे खात्री पटल्याने त्यास अटक केली.

Advertisement

सदर आरोपीताकडून आत्तापर्यंत १० डेबीटकार्ड, १३ पासबुक, १५ चेकबुक, एक ०५ जी सीमकार्ड, सोने खरेदी पावत्या, इतर कागदपत्रे, ७० हजार रुपये किमतीचे ४ मोबाईल, ०१ टॅब, ०१ लॅपटॉप, १,०५,०००/- रूपये रकमेचे पिवळ्या धातुचे दागिने, तसेच ४० लाख रुपये किमतीची एक टोयोटा इनोव्हा कार व ८ लाख रुपये किमतीची एक किया सोनेट कार असा मुद्देमाल (एकूण ४९ लाख ७५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे. आरोपीताचा हैद्राबाद न्यायालयाकडून ट्रान्झिट रिमांड घेऊन त्यास पुणे येथे आणण्यात आले असून मा. न्यायालयाने आरोपीताची दि. २८/०९/२०२५ रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केली आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त पुणे शहर, श्री अमितेशकुमार, मा. पोलीस सह आयुक्त पुणे शहर श्री रंजनकुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त पुणे शहर, श्री पंकज देशमुख (गुन्हे) मा. पोलीस उप- आयुक्त आर्थिक व सायबर पुणे शहर श्री विवेक मासाळ मा. पोलीस उप-आयुक्त (पोलीस मुख्यालय) श्रीमती राजलक्ष्मी शिवणकर, मा. सहा. पोलीस आयुक्त आर्थिक व सायबर पुणे श्री. मच्छिंद्र खाडे, यांचे मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस स्टेशन पुणे शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती स्वप्नाली शिंदे, पोलीस निरीक्षक श्रीमती संगिता देवकाते, पोलीस अंमलदार संदिप मुंढे, बाळासोा चव्हाण, नवनाथ कोंडे, संदिप कारकूड, म.पोलीस अंमलदार टिना कांबळे, पोलीस अंमलदार अमोल कदम, सचिन शिंदे, गंगाधर काळे, अदनान शेख, सतिश मांढरे, कृष्णा मारकड, म.पो. अंमलदार सुप्रिया होळकर या पथकाने सदरची कामगिरी केली आहे.

सदर आरोपी हा सराईत आरोपी असुन त्याचेवर खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page