खुनातील आरोपीला मार्केटयार्ड पोलीस ठाणेच्या तपास पथकाने शिताफीने अवघ्या सहा तासात केले जेरबंद..!

खुनातील मुख्य आरोपी व अनेक गुन्हात सामिल असलेला सराईत गुन्हेगार नामे कौशल कमलेश लांडगे, वय २० वर्षे, रा. शिवराय कॉलनी, गल्ली नं ०२, फराटे चौक, काळेपडळ, हडपसर, पुणे. यास मार्केटयार्ड पोलीस ठाणेच्या तपास पथकाने शिताफीने अवघ्या सहा तासात केले जेरबंद”

त्याबाबत सविस्तर माहिती अशी की, मार्केटयार्ड पोलीस ठाणेच्या कार्यक्षत्रात असणा-या गंगाधाम चौकामधे दिनांक २०/०४/२०२६ रोजी पहाटे ०४:४५ वा. सुमारास इसम नामे रोहन कांतीलाल ओव्हाळ जो कि एक सुप्रसिद्ध रॅपर व रिल स्टार होता त्याचा पेव्हर ब्लॉकने डोक्यात मारून व बॅटम पट्टीने शरीरावर गंभीर जखमा करून खुन करण्यात आला होता. तरी सदर बाबत मार्केटयार्ड पोलीस ठाणे येथे गु.र.नं. ७०/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१), ३ (५) अन्वये गुन्हा दाखल आहे. तरी सदर खुनाचा मांस्टरमाईंड हा सराईत गुन्हेगार नामे कौशल कमलेश लांडगे, वय २० वर्षे, रा. शिवराय कॉलनी, गल्ली नं ०२, फराटे चौक, काळेपडळ, हडपसर, पुणे. हा असल्याचे समजताच विश्वजीत जगताप, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मार्केटयार्ड पोलीस ठाणे यांचे आदेशाने सदर आरोपीचा शोध घेणे करीता मार्केटयार्ड पोलीस ठाणे कडील तपास पथक हे रवाना झाले होते. तरी सदर आरोपी हा सराईत गुन्हेगार असल्याने व त्याचेवर अनेक पोलीस ठाणेत गुन्हे नोंदी असल्याने तो कोणत्या पद्धतीने स्वताला लपवु शकतो याचा सविस्तर अभ्यास तपास पथकाने करुन तांत्रिक विश्लेषनाचे आधारे त्याचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. आरोपी हा तो त्याचे लोकशन सतत बदलत होता. आरोपी जसे लोकेशन बदलत होता त्याच प्रमाणे तपास पथक त्याच्यासाठी सापळा रचत होते पंरतु तो सराईत असल्याने हाती लागत नव्हता. तरी काही वेळातच तपास पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना आरोपीचे सध्याचे लोकेशन डायस प्लॉट स्वारगेट येथील झोपडपट्टीमधे असल्याचे त्यांचे गोपनिय बातमीदारा मार्फत कळाले. सदर माहीती मिळताच तपास पथक डायस प्लॉट स्वारगेट येथील झोपडपट्टी याठिकाणी रवाना झाले. तेथे पोहचताच तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी आरोपी साठी सापळा रचला असता बातमीदारा मार्फत माहीती मिळाली कि, आरोपी नामे कौशल कमलेश लांडगे एका पत्र्याच्या शेडच्या बाजुला असणा-या एका अरुंद असण्या-या जागेत कोणाला दिसणार नाही अशा अवस्थेत बसला आहे. सदरची माहिती मिळताच तपास पथकाने त्यास चारी बाजुने वेढा दिला. परंतु पोलीस आल्याचे त्याला दिसताच तो तेथुन पळ काढु लागला. आरोपी ज्या दिशेने जात होता त्याठिकाणी तपास पथकातील पोलीस अंमलदार बालाजी शिंदे हे दबा धरुन बसले होते.

Advertisement

जेव्हा आरोपी त्याठिकाणा वरुन पळुन जात आहे हे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी सर्व पथकास सांकेतिक भाषेने अलर्ट केल्याने पथकातील राजेश थोरात, कौस्तुभ जाधव, किरण जाधव, महिबुब नदाफ, दिनेश माने यांनी त्याचा पाठलाग करुन थोड्याच अंतरावर जावुन त्यास ताब्यात घेतले. आरोपीस ताब्यात घेतल्या नंतर पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी प्रथम स्वतःची ओळख सांगुन त्याचा नाव व पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव कौशल कमलेश लांडगे, वय २० वर्षे, रा. शिवराय कॉलनी, गल्ली नं ०२, फराटे चौक, काळेपडळ, हडपसर, पुणे. असे असल्याचे सांगितले. त्यानंतर सदर आरोपीस मार्केटयार्ड पोलीस ठाणे पुणे येथे आणुन अटक करुन पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात आली. तसेच दाखल गुन्ह्यातील इतर दोन विधिसंघर्षीत बालकास ताब्यात घेवुन संरक्षणकामी बाल सुधारगृहात ठेवण्यात आले असुन पुढील योग्य ती कार्यवाही करीत आहोत.

सदरची कारवाई मा. श्री अमितेश कुमार, साो. पोलीस आयुक्त, पुणे शहर. श्री रंजनकुमार शर्मा साो. सह पोलीस आयुक्त, पुणे शहर. श्री राजेश बनसोडे साो. अप्पर पोलीस आयुक्त, पुणे शहर. श्री मिलींद मोहिते साो. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०२ पुणे शहर, श्री राहुल आवारे साो. सहा पोलीस आयुक्त, भारती विद्यापीठ विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली मार्केटयार्ड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विश्वजीत जगताप व श्रीमती सुनिता नवले, पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांचे आदेशाने तपास पथकाचे पोलीस उप-निरीक्षक सुनिल भापकर, पोलीस हवालदार/३४५३ राजेश थोरात, पोलीस हवालदार/६८५ कौस्तुभ जाधव, पोलीस हवालदार/७५५४ किरण जाधव, पोलीस हवालदार/७२७२ महिबुब नदाफ, पोलीस हवालदार/८४८६ गोरख चिनके, पोलीस अंमलदार/८९६५ बालाजी शिंदे, पोलीस हवालदार/१०२८५ दिनेश माने, पोलीस अंमलदार/८५५३ संदीप सुर्यवंशी, पोलीस अंमलदार/२३९२ आशिष यादव यांनी केली आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page