भारतीय असल्याचे बनावट ओळखपत्रे बाळगणा-या दोन बांगलादेशी महिलांसह एका इसमास केले जेरबंद..!

आआंबेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत महिला नामें लीझा मकबूल शेख, रा.स.नं ४८/१/१६, फ्लॅट नं २. योगिनी निवास, आनंद पार्क, आआंबेगाव खु. कात्रज, पुणे या वारंवार बांगलादेश येथे जात असत्याची माहिती प्राप्त झाल्याने त्याबाबत खात्री करणेबाबत मा. वरिष्ठांनी आदेशीत केले होते. त्याप्रमाणे आंबेगाव पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी जावून खात्री केली असता सदरची महिला पत्ता बदलून दुसरीकडे राहण्यास गेली असल्याची माहिती मिळाली. सदर महिलेबाबत गोपनीय माहिती काढून तीचा शोध घेतला असता सदरची महिला सिध्दीविनायक सोसायटी आंबेगाव बु. कात्रज पुणे या विकाणी राहत असल्याची माहिती पोलीस अंमलदार सागर नारगे यांना मिळाल्याने सदर विकाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शरद झिने, पोलीस उप-निरीक्षक युवराज शिंदे व पोलीस स्टाफ यांनी छापा टाकला असता महिला नामे १) लीझा मकबूल शेख ऊर्फ खातून तस्लीमा वय ३० वर्षे रा. सिध्दीविनायक सोसायटी आंबेगाव बु. कात्रज, पुणे मिळून आली. तसेच तीचेसोबत तिची बहीणी नामे २) रिंकी देवी ऊर्फ खात्न तमीना मकबूल मोरल वय ३८ वर्षे रा. सदर व बहीणीचा पती ३) प्रमोद कुमार चौधरी वय ४० वर्षे रा. सदर मुळपत्ता ग्राम फतेहपुर, पोस्ट सीनायों, थाना परवलपूर, पर्बलपुर, नालंदा, बिहार हा देखील मिळून आला. सदर महिलेची विचारपूस करता त्यांनी भारतीय असल्याचे आधारकार्ड, पॅनकार्ड, पासपोर्ट व इतर कागदपत्रे सादर केली. त्यानंतर नमूद राहत्या घराची पथकाकरवी झडती घेतली असता महिला नागे लीझा मकबूल शेख हीचा बांग्लादेशचा पासपोर्ट मिळून आल्याने त्यावरून ती बांगलादेशी नागरिक असून, तिचे नाव खातून तस्लीमा, वडीलांचे नाय मकबूल, पतीचे नाव मोफीजुर रेहमान (ममत) तसेच तिचे बहिणीचे नाव रिंकी देची ऊर्फ खातून तमीना मकबूल मोरल रा. गाव-चाँवपाडा, पोस्ट हमीदपुर, गणा-कोतवाली, राज्य. जैसुर, बांगलादेश असे असत्याने सदरची महिला बांगलादेशी असल्याची खात्री झाली. तसेच नमुद बांग्लादेशी महिला रिंकी ऊर्फ तमीना हिने सोबत असणारा इसम नामे प्रमोद कुमार चौधरी ग्राम फतेहपुर, पोस्ट सीनावों, थाना-परवलपूर, पर्बलपुर, नालंदा, बिहार याचेसोबत विवाह केला असून त्यानेच नमुद महिलांना वरील प्रमाणे बनावट ओळखपत्रे बनवून दिल्याचे निष्पन्न झाल्याने नमुद तिघांना ताब्यात घेवून पोलीस ठाणे येथे आणून त्यांचेविरुध्द आंबेगांव पोलीस स्टेशन येथे गु.र.नं १३१/२०२५. भा.दं. वि. कलम ४२०. ४६५. ४६७. ४६८, ४७१. ३४ सह भारतीय पारपत्र अधिनियम १९६७ चे कलम १२ (१अ) (अ) (ब), १२(२) सह विदेशी व्यक्ती अधिनियम सन १९४६ चे कलम १४ अ (अ) (ब), १४ व. १४ क प्रमाणे गुन्हा नोंद करून त्यांना अटक करण्यात आली आहे.

Advertisement

सदरची कारवाई ही मा. पोलीस आयुक्त पुणे शहर. श्री. अमितेश कुमार, मा. पोलीस ग्रह आयुक्त पुणे शहर श्री. रंजनकुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त. पश्चिम प्रादेशीक विभाग पुणे शहर श्री. राजेश बनसोडे, मा. पोलीस उप-आयुक्त परि २ पुणे शहर, श्रीमती स्मार्तना पाटील. मा. सहाय्यक पोलीस आयुक्त. स्वारगेट विभाग पुणे श्री. राहुल आवारे, यांचे मार्गदर्शनाखाली आबेगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शरव झिने, पोलीस निरीक्षक गुन्हे श्री. गजानन चोरमले, पोलीस उप-निरीक्षक युवराज शिंदे, पोलीस अमलदार निलेश जमदाडे, सागर नारगे, प्रमोद भोसले, स्वप्निल शर्मा, म.पोलीस अंमलदार पूजा खवले यांच्या पथकाने केली आहे

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page