पोक्सोतील फरार आरोपीतांच्या २४ तासांचे आत आवळल्या मुसक्या..!

लोणी काळभोर पोलीस ठाणे हद्दीत राहणेस असलेली पिडीत मुलगी निर्भया हिचेसोबत आरोपी नामे साहिल मेहबुब शेख वय १९ वर्षे रा. मोरेवस्ती, मांजुरी बु. हडपसर पुणे याने मैत्रीसंबंध प्रस्तापीत केले. पिडीत मुलीचे बालवाचा फायदा घेवुन आरोपीने तीचेशी अश्लिल कृत्य करुन सदर अश्लिल कृत्याचे फोटो त्याचे मोबाईलमध्ये काढले. पिडीता निर्भया ने आरोपीस अश्लिल कृत्य करण्यास व त्याचेशी प्रेमसंबंध प्रस्थापित करण्यास नकार दिला असता आरोपीने पिडीतेस तीचे त्याचेसोबतचे फोटो सोशल मेडीयावर व्हायरल करण्याची धमकी दिली. त्याबाबत लोणी काळभोर पोलीस ठाणेस गु. र. नं.३५/२०२५ भा.न्या. सं. क. ७४, ३५१ (२) (३). लैंगिक अत्याचारापासुन बालकांचे संरक्षण अधिनियम कलम ८, १२ प्रमाणे दि. २०/०१/२०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्हा दाखल झालेपासुन आरोपी फरार होवुन स्वतः चे अस्तित्व लपवुन कोठेतरी लपुन बसला होता. त्याने त्याचा मोबाईल व सर्व प्रकारचे संपर्काची साधने बंद केल्याने त्याचा ठावठिकाणा लागत नव्हता परिस्थितीचे गांभिर्य लक्षात घेवुन लोणी काळभोर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र पन्हाळे यांनी आरोपीचा शोध घेणेकरीता स्वतंत्र पथक तयार करुन अहोरात्र आरोपीताचा मागोवा घेतला. अथक प्रयत्नानंतर लोणी काळभोर चे पथकास फरार आरोपी साहिल मेहबुब शेख याच्या मुसक्या आवळण्यात यश आले. त्यानुसार सदर आरोपीस दि. २१/०१/२०२५ रोजी लोणी काळभोर पोलीसांनी २४ तासाचे आत अटक केली. सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०५, डॉ. राजकुमार शिंदे, मा. सहा. पोलीस आयुक्त, हडपसर विभाग, श्रीमती अनुराधा उदमले यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक लोणीकाळभोर पोलीस स्टेशन श्री. राजेंद्र पन्हाळे, पोउपनि अनिल जाधव, पोलीस उप निरीक्षक पुजा माळी, पोलीस अंमलदार सातपुते, शिंदे, देवीकर, नागलोत, वाघमोडे, विर, जोजारे, कुदळे, पाटील, शिरगिरे, गाडे, कर्डीले यांनी केली आहे.
संपादक -आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक -अकबरजी शिकलकर 8625870039




