घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपीला 24 तासात अटक; लोणी काळभोर पोलिसांची मोठी कारवाई

पुणे : लोणी काळभोर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील लोणी काळभोर येथील शांती किरण सोसायटी येथे झालेली घरफोडीचा गुन्हा २४ तासात उघडकिस आणून आरोपी प्रेम बहादुर दोदी दौमाई (वय ४३वर्षे सध्या राहणार घोरपडे वस्ती कदमवाकवस्ती मूळ नेपाळ) याला ताब्यात घेतले असून चोरीतील मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इनामदार वस्ती बाजार मळा रोड लगत असलेल्या शांतीकिरण सोसायटी मध्ये राहणारे मासुन परवेज अब्दुलमतीन वय ४५ वर्षे हे त्यांच्या मुळ गावी आसाम येथे गेले असताना त्यांच्या बंगल्याच्या दरवाजाचा कडी-कोयंडा कशाचे तरी सहाय्याने तोडुन लाकडी कपाटाचे लॉक तोडुन लाकडी कपाटातील लॉक असलेल्या ड्राव्हरमधील सोन्याचे दागिने व इतर साहीत्य असे एकुण १,९५,५००/- रुपयांची चोरी करून पसार झालेल्या अज्ञात आरोपीचा शोध घेणेकामी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट यांनी तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके व तपास पथकातील पोलिस बाजीराव वीर, रामहारी वनवे, विलास शिंदे, सुरज कुभांर याना सुचना केल्या केल्या होत्या.

Advertisement

या सूचनेवरून वरील आरोपीचा शोध घेत असताना पथकातील पोलिस बाजीराव वीर यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, एक ३५ ते ४० वयोगटाचा नेपाळी दिसणारा इसम घोरपडे वस्ती येथे महागडा मोबाईल विक्री करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्या अनुषंगाने पोलिस उपनिरीक्षक अमोल घोडके पथकातील पोलिसांबरोबर घोरपडे वस्ती चौकात सापळा लावुन थांबले असता मिळालेल्या माहितीनुसार एक इसम संशयीत रित्या हालचाल करुन निघुन जात असलेला प्रेमबहादुर दोदी दौमाई (वय-४३वर्षे, सध्या राहणार घोरपडी वस्ती कदमवाकवस्ती ता.हवेली जिल्हा पुणे. मुळ राहणार लमकी चुवा जिल्हा कौलाली नेपाळ) याला ताब्यात घेऊन घडलेल्या चोरीच्या गुन्ह्याविषयी चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याचे कबुल केले. घरफोडी करून चोरी केलेले सोन्याचे दागीने व इतर साहीत्य एकुण १,३२,०००/- रूपयाचा मुद्देमाल जप्त करून ताब्यात घेतला असुन सदर आरोपीस अटक केले असुन दाखल गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके करीत आहेत.

सदरची कारवाई अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उप-आयुक्त आर राजा, सहाय्यक पोलीस आयुक्त अश्विनी राख, लोणी काळभोरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके, पोलिस हवालदार बाजीराव वीर, रामहारी वनवे, विलास शिंदे, सुरज कुंभार, संभाजी देवीकर, गणेश सातपुते, शैलेश कुदळे, योगेश पाटील, चक्रधर शिरगीरे, प्रदीप गाडे, सुनिल नागलोत यांच्या पथकाने केली आहे.

जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page