पिडीत मुलीस सुखरूप ताब्यात घेवुन अपहरणाचा फेक व्हिडीओ कॉल करून पैशांची मागणी करणा-या इसमांविरूध्द गुन्हा दाखल

दिनांक १८/०६/२०२६ रोजी सायंकाळी १६/०० वा चे सुमा. पिडीत फिर्यादी रा. काकडे वस्ती, कोंढवा बु. पुणे, मुळ रा. बिहार यांची पिडीत अपहृत मुलगी वय १७ वर्ष हिस कोणीतरी अज्ञात इसमाने लबाडीचे इराद्याने त्यांचे कायेदशीर रखवालीतुन फुस लावुन पळवुन नेले. म्हणुन कोंढवा पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ४७४/२०२६ भा.न्या.सं.क.क १३७ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
दाखल गुन्हयाचे अनुषंगाने तपास पथाकाकडील पोलीस स्टाफ सिसीटीव्ही फुटेजचे आधारे पिडीत मुलीचा शोध घेत होते. त्यादरम्यान फिर्यादी यांना त्याचे मोबाईल क्रमांकावर अनोळखी इसमांने व्हिडीओ कॉल करून तुम्ही पोलीस स्टेशन येथे काय करत आहात तुमची मुलगी आमचे ताब्यात आहे असे म्हणुन त्यांचे मोबाईलवर युपीआय स्कॅनर पाठवुन पैशांची मागणी केली असता फिर्यादी यांनी सदरबाबत पोलीस स्टेशन येथे येवुन माहिती दिली. सदरची माहिती मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस यांनी मा. वरिष्ठांना कळविली असता मा. पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार यांनी सदर घटनेचे गांभीर्याने दखल घेवुन मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे व मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-५ यांना तात्काळ कारवाई करणेबाबत आदेशीत केले असता त्यांनी घटनास्थळास भेट देवुन पिडीत मुलीचा शोध घेणेकामी टिम तयार करून त्यांना सुचना दिल्या.
त्यानंतर कोंढवा पोलीस तपास पथकाने तांत्रिक विश्लेषनावरुन पुणे रेल्वे स्टेशन येथे जावुन सिसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता पिडीत मुलगी ही आझाद हिंद एक्सप्रेस हावरा, कलकत्ता येथे जाणाऱ्या रेल्वेमध्ये बसली असल्याची माहिती मिळाली. त्यांनी तात्काळ रेल्वे विभागाशी संपर्क करुन सदर रेल्वेची माहिती घेतली. सदर रेल्वे ही टाटानगर जमशेदपुर (झारखंड) येथे थोडया वेळयात पोहचणार असल्याची माहिती मिळाली असता त्यांनी तात्काळ टाटानगर जमशेदपुर (झारखंड) रेल्वे पोलीस व टि.सी. यांना संपर्क करून पिडीत मुलगीचा शोध घेण्यास सांगीतले असता पिडीत मुलगी ही आझाद हिंद एक्सप्रेस या रेल्वेमध्ये मिळुन आल्याने तिला रेल्वे पोलीस व टि.सी. यांचे टिमने सुखरूप ताब्यात घेतले. त्यानंतर तात्काळ कोंढवा पोलीस स्टेशनकडील पथक व फिर्यादी यांना टाटानगर, जमशेदपुर (झारखंड) येथे रवाना करून पिडीत मुलीस सुखरूप ताब्यात घेतले आहे.
तसेच फिर्यादी यांना फेक अपहरणाचा व्हिडीओ कॉल करून पैशांची मागणी करणा-य इसमांविरूध्द कोंढवा पोलीस स्टेशन ४७८/२०२६, भा.न्या.सं.क. ३१८ (४), ३०८ (२), ३५१ (२) सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६ (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरील नमुद कारवाई ही मा. पोलीस आयुक्त, श्री. अमितेशकुमार, मा. सह पोलीस आयुक्त, श्री संजय दराडे, मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशीक विभाग, श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप- आयुक्त गुन्हे, श्री. गौहर हसन, मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-५ श्रीमती राजलक्ष्मी शिवणकर, मा. सहा. पोलीस आयुक्त वानवडी विभाग श्रीमती नम्रता देसाई यांचे मार्गदर्शनाखाली मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस, मा. पोलीस निरीक्षक गुन्हे प्रशांत मंडले यांच्या सुचनांप्रमाणे कोंढवा पोलीस स्टेशन येथील तपास पथकाचे पोलीस उप-निरीक्षक रविंद्र गावडे, पोलीस अंमलदार रविंद्र चिप्पाविशाल मेमाणे, अमोल हिरवे, पुष्पेंद्र चव्हाण, संतोष बनसुडे, सुरज शुक्ला, अमित सुर्यवंशी, केशव हिरवे, प्रशांत खाडे, रियाज पटेल, राहुल रासगे, राहुल शेलार, रशिद शेख, शाहिद रजपुत व ओंकार शेटे यांच्या पथकाने केली आहे.




