तरुणावर धारदार शस्त्राने चौघांचा हल्ला; वाघोलीतील खळबळजनक घटना

पुणे : पुणे शहरातील गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस प्रचंड वाढत चाललं आहे. पुण्यात गुन्हेगारांचा सर्रास वावर सुरू असून, त्यांना खाकी वर्दीची काही भीतीच नसल्याचे चित्र दिसत आहे. आता पुण्यात आणखी एक खळबळजक प्रकार घडला आहे. पुण्यात तरुणावर धारदार शस्त्राने चौघांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे.
पुण्याच्या वाघोली परिसरातील बकोरी फाट्यावरील जय महाराष्ट्र खाऊ गल्लीत एका तरुणावर कोयत्याने हल्ला केला, या हल्यात तो गंभीर जखमी झाला. हल्ल्यानंतर तरुणांनी मारहाणीचा व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावर ठेवत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेमधील चारही आरोपी अल्पवयीन असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे, लोणीकंद पोलीस तपास करत आहे
या घटनेमध्ये प्रमोद देशमुख हा तरूण जखमी झाला आहे. तर हल्लेखोरांची नावे अद्याप समजू शकलेली नाही. प्रमोद देशमुखवर कोयत्याने हल्ला करण्यात आला. या हल्यात तो गंभीर जखमी झाला. या आरोपींनी मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर देखील व्हायरल केला आहे.
जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर




