लसूण अन् कांदा महागला, सध्या किती आहे दर?

मुंबई : दिवाळीनिमित्त नाशिक परिसरात कांद्याची खरेदी – विक्री आठवडाभर बंद होती. त्यामुळे बाजारांत काद्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांकडील उन्हाळी कांदा जवळपास संपला आहे. किरकोळ प्रमाणात दोन ते पाच टक्के उन्हाळी कांदा शेतकऱ्यांकडे शिल्लक आहे. खरीप कांद्याची काढणी सुरू असतानाच जोरदार पाऊस झाल्यामुळे कांदा सडला आहे. त्यामुळे खरीप कांद्याच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. परंतु आता कांदा आणि लसणाने ऐन हिवाळ्यात ग्राहकांना घाम फोडला आहे. कांदा आणि लसणाचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे दर वाढले असून नागरिकांनी बाजारभावाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

Advertisement

कांदा 80 तर लसूण 400 पार

मुंबई बाजार समितीत कांदा आणि लसणाचा मोठी प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. कांद्याचे दर 80 रुपये किलो तर लसणाचे दर 400 रुपयांवर जाऊन पोहोचले आहेत. तर मुंबईतील किरकोळ बाजारात कांदा 60 ते 80 रुपये दराने विकला जात आहे. राज्यातील बाजारसमित्यांमध्ये कांदा आणि लसूण यांची आवक कमी झाल्यामुळे तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे पुढील एक महिनाभर कांद्याचे दर आणि पुढील तीन ते चार महीने लसणाचे दर तेजीतच राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page