दोन सराईत गुन्हेगारांना अग्निशस्त्रांसह अटक – घरफोडी व वाहन चोरीच्या गुन्हयांची उकल..!

दिनांक ३१/०१/२०२५ रोजी युनिट ६ कडील प्रभारी पोलीस निरीक्षक वाहिद पठाण व पथक असे फुरसुंगी पो.स्टे. हद्दीत गस्त करीत असताना पो.हवा. नितीन मुंढे यांना मिळालेल्या खबरीवरून आरोपी नामे समीर उर्फ कमांडो हनीफ शेख, वय १९ वर्षे, रा. गल्ली नं.२३, सय्यदनगर, हडपसर, पुणे यास गंगा नगर, फुरसुंगी, पुणे येथुन ताब्यात घेवुन त्याचेकडुन एक देशी बनावटीचे अग्निशस्त्र, २ जिवंत काडतुसे, घरफोडीचे साहित्य आणि चोरीचे मो. सा. सह ताब्यात घेवुन सदर आरोपीताविरूद्ध हडपसर (फुरसुंगी) पो.स्टे. येथे गु.र.क्र. १४८/२५, कलम ३, २५ आर्म अॅक्ट सह ३७ (१) सह १३५ म.पो.का. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन मा. वरिष्ठांचे आदेशाने सदरचा गुन्हा पुढील तपास कामी युनिट कडे वर्ग करण्यात आला होता. नमुद अटक आरोपीताकडे कौशल्यपुर्ण तपास केला असता त्याने कोंढवा पोलीस ठाणे हद्दीत घरफोडी केल्याचे तसेच लोणी काळभोर व हडपसर ठाणे हद्दीत चोरी केल्याची कबुली दिल्याने खालील नमुद गुन्हे उघडकीस आणले आहेत. अटक आरोपीतास अग्निशस्त्र व काडतुसे पुरवणारा अभिलेखावरील आरोपी नामे यश मुकेश शेलार, वय २० वर्षे, रा. तरडे वस्ती, महंमदवाडी, पुणे यास अटक करण्यात आली असुन त्याचेकडुन एक देशी बनावटीचे अग्निशस्त्र हस्तगत करण्यात आले आहे.
सदरची कामगीरी मा. अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री शैलेश बलकवडे, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री निखिल पिंगळे, मा. पोलीस उप आयुक्त श्री विवेक मासाळ (अति. कार्यभार – गुन्हे) मा. सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे२) श्री राजेंद्र मुळीक गुन्हे शाखा, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट ६ चे प्रभारी पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, सहा. पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस उप निरीक्षक रामकृष्ण दळवी, पो.हवा. बाळासाहेब सकटे, रमेश मेमाणे, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, पो.अं. ऋषीकेश ताकवणे, सचिन पवार, ऋषीकेश व्यवहारे, शेखर काटे, गणेश डोंगरे, समीर पिलाने, नितीन धाडगे, बाळासाहेब तनपुरे, पो.हवा. सुहास तांबेकर, मपोअं. प्रतिक्षा पानसरे, किर्ती मांदळे यांनी केली आहे.
संपादक -आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक -अकबरजी शिकलकर 8625870039




