लाडकी बहीण योजनेबाबत संजय राऊतांचा खळबळजनक दावा, म्हणाले; 2 महिन्यांनी…

नवी दिल्ली : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना म्हणजे जनतेची फसवणूक आहे. आता विधानसभा निवडणूक आहे पण दोन महिन्यांनी लाडक्या बहिणीला काही मिळणार नाही, असे वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले. महायुती सरकार राज्यावर कर्जाचा डोंगर करेल आणि पळून जाईल. लाडक्या बहीण योजनेसाठी राज्य सरकारच्या तिजोरीतील पैसा वापरला जात आहे. पण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आमदारांकडे ठेकेदार आणि जनतेकडून लुटलेले पैसे आहेत, असे संजय राऊत यांनी म्हटले.

यावेळी संजय राऊतांनी मोदी सकारवर टीकेचा आसूड ओढला आहे. एकवर्षही झाले नाही संसद बनवून, एक वर्षही झाले नाही राममंदिर बनवून आणि दोन्ही इमारतींना पहिल्याच पावसात गळती लागली आहे. नवी संसद इमारत टाटांनी बांधली, राममंदिर लार्सन अँड ट्रुब्रो यांनी बांधले, पण त्यांचे ठेके कोणाला दिले होते, ते कोणत्या राज्यातील आहे, कोणाला काय मिळाले याचा आता हिशोब झाला पाहिजे, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Advertisement

राहुल गांधी यांच्यावर हल्लाचा कट : संजय राऊत

राहुल गांधी गेल्या एक महिन्यापासून सरकारला त्यांचा आरसा दाखवत आहेत. त्यांनी मोदी आणि शाह यांना सळो की पळो करून सोडले आहे. त्यामुळे राहुल गांधी असतील आम्ही सगळे असू. आम्हाला पुन्हा एकदा कारवाईला समोर जावे लागेल. आमची तयारी आहे, असे हल्लाबोल शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तसेच परदेशी भूमीवर कट रचला जात आहे. राहुल गांधींसह आमच्यावर गुंडांच्या मदतीने हल्ला होऊ शकतो, असा गंभीर आरोपदेखील त्यांनी केला आहे.

जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page