जालन्यात पोस्टाद्वारे मागवलेल्या 22 तलवारी जप्त, दोघांना अटक

जालना : पोस्टाद्वारे मागवलेल्या 22 तलवारी जालना पोलिसांनी जप्त केल्या आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी मुख्य पोस्ट ऑफिसच्या परिसरात छापा टाकला आणि 2 आरोपीला अटक केली. पंजाबमधील अमृतसरमधून या तलवारी कशाच्या उद्देशाने मागवण्यात आल्या आहेत याचा तपास पोलिस करत आहेत.
जालन्यात पोस्टाच्या माध्यमातून तलवारी येणार असल्याची माहिती पोलिसांन मिळाली आणि पलिसांनी आरोपीला पकडण्यासाठी जाळं टाकलं. आरोपींना पकडल्यानंतर त्यांच्या ताब्यातून पोलिसांनी पोस्टाद्वारे आलेले पार्सल तपासले. त्यामध्ये तब्बल 22 तलवारी आढळून आल्या. याप्रकरणी 2 आरोपीला पोलिसांनी अटक केली असून एवढ्या मोठ्या प्रमाणात या तलवारी कुठल्या उद्देशाने आणण्यात आल्या आहेत याचा तपास पोलिस घेत आहेत.
या कारवाईमुळे जालना जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांच्यासह त्यांच्या सर्व टीमचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून, कामगिरीबद्दल कौतुकाचा वर्षाव होत आहे.
जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- श्रीकृष्ण जाधव




