‘मातोश्री’बाहेर मराठा समाजाचं आंदोलन; आंदोलकांना अंबादास दानवे भिडले

मुंबई : मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. आरक्षणावरुन विरोधकांसह सत्ताधारी विविध भूमिका घेत आहे. मागील अनेक महिन्यांपासून मराठा नेते मनोज जरांगे पाटील हे अनेकदा उपोषणावर बसलेले आहे. मात्र तरीही समाधानकारक निर्णय न झाल्यामुळे मराठा सामज आक्रमक झाला आहे. आता मराठा समाज थेट मातोश्री बंगल्यावर येऊन धडकला आहे. शिवसेना ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी मराठा आंदोलकांकडून करण्यात येत आहे.

मराठा आंदोलकांनी मातोश्रीवर धडक दिल्याचे समजताच अंबादास दानवे तातडीने त्याठिकाणी पोहोचले. यानंतर अंबादास दानवे हे स्वत: मराठा आंदोलकांना सामोरे गेले. तत्पूर्वी मातोश्रीवर ज्यांच्या नेतृ्त्त्वाखाली मोर्चा काढण्यात आला आहे ते रमेश केरे पाटील हे भाजपचे कार्यकर्ते आहेत. ते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या चेंबरमध्ये काही दिवसांपूर्वी दिसले होते, असे अंबादास दानवे यांनी म्हटले. त्यानंतर अंबादास दानवे मातोश्रीसमोर जमलेल्या मराठा आंदोलकांच्या जमावासमोर गेले.

Advertisement

उद्धव ठाकरे शिष्टमंडळाला भेटणार

अंबादास दानवे मातोश्रीवर गेल्यानंतर उद्धव ठाकरे हे मातोश्रीबाहेर असणाऱ्या मराठा आंदोलकांची भेट घ्यायला तयार झाले आहेत. आता रमेश केरे पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली चार जणांचे शिष्टमंडळ उद्धव ठाकरे यांना भेटेल. यावेळी नेमकी काय चर्चा होणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

मातोश्रीवर पोलीस बंदोबस्तात वाढ

याच पार्श्वभूमीवर मातोश्री बंगल्याबाहेरील सुरक्षेमध्ये वाढ झाली आहे. पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी अशी सकल मराठा समाजाची मागणी आहे. कालपासून पदाधिकारी व आंदोलक मातोश्री बाहेर असून उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका देखील स्पष्ट केली नसून त्यांना भेट देखील दिली नाहीये. आज मराठा क्रांती ठोक मोर्चा मातोश्रीबाहेर आंदोलन करत असल्यामुळे पोलीस सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे.

जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page