रिक्षाचालकाची पोलीस शिपायाला मारहाण…

पुणे (संपादक अकबर शिकीलगार) :- पुण्यातील हडपसर भागात रिक्षाचालकाने पोलीस शिपायाला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. नाकाबंदी करून संशयित वाहनांची तपासणी सुरू असताना रस्त्यात आडवी लावलेली रिक्षा बाजूला काढण्यास सांगितल्याने रिक्षाचालकाने पोलीस शिपायाला मारहाण केल्याची घटना घडली आहे.

Advertisement

या प्रकरणी रिक्षाचालकावर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सचिन अंबादास शेलार (वय-२८, रा. मुंढवा) असे गुन्हा दाखल केलेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. शेलार याच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस नाईक प्रमोद ढाकणे (वय-३५) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी पोलीस शिपाय हे हडपसर पोलीस ठाण्यात रात्रपाळीस होते. पोलीस नियंत्रण कक्षाच्या आदेशाने हडपसर भागातील सिझन्स मॉल परिसरात रात्री नाकाबंदी करण्यात आली. त्यावेळी रस्त्यात शेलार याने रिक्षा आडवी लावली होती.

याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी पोलीस शिपाय हे हडपसर पोलीस ठाण्यात रात्रपाळीस होते. पोलीस नियंत्रण कक्षाच्या आदेशाने हडपसर भागातील सिझन्स मॉल परिसरात रात्री नाकाबंदी करण्यात आली. त्यावेळी रस्त्यात शेलार याने रिक्षा आडवी लावली होती.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page