आमचा काका-मामा राजकारणात नाही हे आमचं चुकलं का…

पुणे : लोकसभा निवडणुकीचा चौथ्या टप्प्यासाठीच्या प्रचाराच्या तोफा आता थंडावल्या आहेत. उद्या (१३ मे) रोजी मतदान पार पडणार आहे. दरम्यान या शिरुर लोकसभा मतदारसंघातील एका सभेत अजित पवारांनी खासदार अमोल कोल्हे यांना जाहीर मंचावरुन अमोल कोल्हेला पाडूनच दाखवतो, असा जाहीर इशारा दिला.
आता उपमुख्यमंत्री यांच्या याच विधानाचा आता अमोल कोल्हेंनी जबरदस्त समाचार घेतला आहे. २०२४ शेवटच्या प्रचारसभेत (११ मे) अमोल कोल्हे म्हणाले, अजितदादा म्हणतात अमोल कोल्हे पाडूनच दाखवतो. मला खरंच प्रश्न पडतो. मी जर तत्व आणि स्वाभिमान गहान टाकून मोदींची तळी उचलून धरणाऱ्या तुमच्या महायुतीच्या बाजूने सामील झालो असतो तर तुम्ही हेच बोललं असतं का?
दादा तुम्ही म्हणता ना अमोल कोल्हेला पाडून दाखवतो. खडा सवाल आहे आमचा. या शेतकऱ्याच्या मुलाला पाडायला दोन दोन उपमुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, राज्यातली सत्ता देशातली सत्ता लावावी लागत असेल तर माझ्याकडे पवार साहेबांचा आशीर्वाद आणि मायबाप जनता आहे, असेही कोल्हे म्हणाले.




