विमानात सिगारेट ओढणं पडलं महागात; एकावर गुन्हा दाखल

पुणे : विमानात ज्वलनशील ज्वलनशील पदार्थ नेण्यास किंवा सिगारेट ओढण्यास बंदी असतानाही दिल्लीहून पुण्याकडे येणाऱ्या विमानात एका प्रवाशाने स्वच्छतागृहात जाऊन सिगारेट ओढत मद्यपान केल्याचा धक्कादायक प्रकार भडला आहे. इंडिगो एअरलाइन्स विमानात ही घटना घडली. लोहगाव विमानतळावर विमान उतरल्यानंतर पोलिसांनी सिगारेट ओढणाऱ्या प्रवाशाला ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
नक्षब जहांगिर (38, रा. रोझ अपार्टमेंट, ओखला विहार, नवी दिल्ली सध्या रा. एस. व्हि. पी.जी, बाणेर गाव) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, जहांगीर हे दिल्लीतील आहेत. ते दिनांक ९ सप्टेंबर रोजी रात्रीच्या फ्लाईटने प्रवास करत होते. ते दिल्लीवरून येत होते. रात्री साडेबाराच्या सुमारास इंडिगो फ्लाईटने विमान हवेत असताना फ्लाईट अनाउंसमेंटमध्ये सिगारेट ओढण्यास मनाई आहे अशा सुचना दिल्या होत्या. तरी देखील नक्षबने निष्काळजीपणे विमानाच्या बाथरूमध्ये सिगारेट ओढली. सिगारेट ओढताना केबिन अटेडन्ट गिनी आणि निलीमा यांनी त्याला पाहिले. त्यानंतर त्यांनी सिक्युरिटी मॅनेजर यांना याबाबत कळविले. त्यानुसार विमान पुण्यात आल्यानंतर आरोपीला विमानतळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. यावेळी विमानातील बाथरूममधून सिगारेटचे जळलेले तुकडे जप्त करण्यात आले.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




