पुण्यात फसवणूकीचे सत्र सुरुचं; आयुर्विमा पॉलिसीच्या नावाखाली तरुणीला घातला लाखोंचा गंडा

पुणे : पुण्यात फसवणूकीचे सत्र सुरुचं आहे. पुण्यासह राज्यातील वेगवेगळ्या भागातून दररोज फसवणुकीच्या घटना उघडकीस येत आहेत.अशातचं आता आयुर्विमा पॉलिसीच्या बहाण्याने सायबर चोरट्यांनी तरुणीची १३ लाख १२ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी वानवडी पोलिसांत एका २८ वर्षीय तरुणीने वानवडी पोलिसांत तक्रार दिली आहे.

Advertisement

तरुणी वानवडी येथील परमार पार्क येथे राहते. सायबर चोरट्यांनी ५ महिन्यांपूर्वी तरुणीच्या मोबाइलवर संपर्क साधला. आयुर्विमा कंपनीतील प्रतिनिधी असल्याची बतावणी केली. खासगी कंपनीच्या आयुर्विमा पॉलिसीच्या वार्षिक भरण्याबाबत विचारणा केली. तर बतावणी करुन तरुणीच्या बँक खात्याची गोपनीय माहिती घेतली. पॉलिसीतील काही रक्कम परताव्यापोटी देऊ अशी बतावणी करुन चोरट्यांनी तरुणीच्या बँक खात्याची माहिती घेतली. चोरट्यांनी दिलेल्या बँक खात्यात तरुणीने वेळोवेळी १३ लाख ३२ हजार रुपये जमा केले. नंतर चोरट्यांनी तरुणीला आणखी रक्कम पाठवा असे सांगितले. संशय आल्याने तिने चौकशी केली. तेव्हा फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला. पोलीस अधिक तपास करत आहेत.

संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page