आमदार रविंद्र धंगेकर यांच्यावर गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?

पुणे – पुण्यातील कॉंग्रेसचे कसबा पेठचे आमदार रविंद्र धंगेकर हे मतदारांना दिवाळी फराळाचे वाटप करुन प्रलोभीत करत आहेत असा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला आहे. रविंद्र धंगेकरांकडून वाटप करण्यासाठी निघालेला दिवाळी फराळाचा टेम्पो भाजपच्या कार्यकर्त्यांनी अडवली आहे. त्यानंतर पुण्यातील समर्थ पोलीस ठाण्यात हा फराळाचा टेम्पो नेण्यात आला आहे. याप्रकरणी भाजपकडून धंगेकरांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत निवडणूक आयोगातील अधिकाऱ्यांनी समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. हिंदमाता प्रतिष्ठानकडून दिवाळीनिमित्त कसबा मतदारसंघातील नागरिकांनी दिवाळीनिमित्त सुगंधी, उटणे, उदबत्ती, रांगोळी अशा वस्तू असलेल्या पिशव्यांचे वाटप करण्यात आले. पिशवीवर धंगेकर यांच्यासह त्यांच्या पत्नीचे छायाचित्रे असून, मतदारांना प्रलोभन दाखविण्यात आल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे करण्यात आली. त्यानंतर रविवारी रात्री निवडणूक आयोगातील अधिकाऱ्यांनी समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
दरवर्षी माझा मित्र परिवारआनंदाची दिवाळी भेट देतो. नागरिकांच्या आनंदात सहभागी होण्यासाठी हा उपक्रम राबविला जातो. आचारसंहिता लागू केल्यानंतर कुठल्याही प्रकारचे प्रलोभन किंवा वस्तुंचे वाटप करण्यावर बंधन आहे, याची जाणीव मला आहे. या उपक्रमात माझा व्यक्तिश सहभाग नाही. मला अजून उमेदवारी जाहीर झाले नाही. माझा कसब्यातून विजय पक्का असल्याने विरोधकांच्या मनात धडकी भरली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे छायाचित्र असलेल्या पिशव्यांतून नागिरकांना दिवाळीनिमित्त वस्तूंचे वाटप सुरू आहे. माझा मित्र परिवार नागरिकांच्या आनंदात सहभागी होण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करतो. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे छायाचित्र असलेल्या पिशव्यांचे वाटप कोण रोखणार, असा प्रश्न धंगेकर यांनी उपस्थित केला आहे. माझ्यावर जर गुन्हा दाखल होऊ शकतो, तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी धंगेकर यांनी केली आहे.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




