गंभीर गुन्हयात एक वर्षापासुन फरारी आरोपीस केले जेरंबद..!

स्वारगेट पोलीस स्टेशन गु.र.नं २४८/२०२६ भा.न्या.सं, क १०९,१८९,१८९(२),१९१(३) सह आर्म अॅक्ट ४/२५ अन्वये दाखल गुन्हयातील आरोपी नामे राजसिंग युवराजसिंग जुनी हा गुन्हा करुन फरार झाला होता. त्याअनुषंगाने युनिट २, गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार सदर गुन्हयातील पाहिजे आरोपीताचा शोध घेत होते.

दिंनाक ०९/०४/२०२६ रोजी गुन्हे शाखा युनिट २ कडील पोलीस अधिकारी व अंमलदार हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार अजीम शेख व विशाल दळवी यांना गोपनिय बातमीदारमार्फतीने बातमी मिळाली की सदर गुन्हयातील पाहिजे आरोपी हा शिवाजीनगर पाटील इस्टेट भागात आलेला आहे. सदरची बातमी युनिट २ चे प्रभारी पोलीस निरीक्षक अश्विनी जगताप यांना कळविली असता त्यांनी सदर ठिकाणी जावून खात्री करून कायदेशीर कारवाई करणेबाबत कळविले. त्याप्रमाणे युनिट-२ कडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी गुन्हयातील पाहिजे आरोपीस पाटील इस्टेट भागात सापळा रचून ताब्यात घेवून त्यास त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव राजसिंग युवराजसिंग जुनी वय २८ वर्ष रा. पाटील इस्टेट शिवाजीनगर पुणे असे सांगितले. त्याचा स्वारगेट पोलीस स्टेशनचे गुन्हयात सहभाग असलेबाबत खात्री करुन त्यास पुढील कारवाईकरीता स्वारगेट पोलीस स्टेशन च्या ताब्यात देणेत आले आहे.

Advertisement

सदरची कामगिरी ही मा.अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री पंकज देशमुख मा पोलीस उप आयुक्त गुन्हे, श्री निखिल पिंगळे, मा. सहायक पोलीस आयुक्त, श्री. शैलेश संखे यांचे मार्गदर्शनाखाली युनिट २ चे प्रभारी अश्विनी जगताप यांचे सुचनांप्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस अंमलदार सददाम तांबोळी, अजीम शेख, विशाल दळवी, नागनाथ राख, शंकर नेवसे, उज्वल मोकाशी, विनोद चव्हाण, शंकर कुंभार, ओमेकार कुंभार, विशाल दळवी विनायक वगारे तसेच महिला पोलीस अंमलदार साधना ताम्हाणे यांनी केली

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page