रेकार्डवरील गुन्हेगाराकडुन एक पिस्टल व दोन जिवंत काडतुस केले जप्त..!

दि.०८/०३/२०२५ रोजी सहा. पोलीस निरीक्षक, सचिन निकम, पोलीस उप निरी. संतोष भांडवलकर, स्टाफ सह अग्निशस्त्रासंबंधीत मिळालेल्या बातमीची खात्री करुन कारवाई करणे कामी पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार राहुल ओलेकर, विनायक मोहीते यांना त्याचे खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सोमा चांदणे यांच्याकडे एक गावठी पिस्टल असुन तो कुदळे याचे पत्र्याचे शेडजवळ वडगाव पठार वडगाव पुणे येथे थांबलेला आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाली. आम्ही लागलीच सोबतचे पोउपनि संतोष भांडवलकर यांना कळविली असता त्याने ती पुन्हा वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे यांना कळविली असता त्यांनी योग्य ती कायदेशिर कारवाई करण्याचे आदेश दिल्याने सोबतचे स्टाफ व पंचासह मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी रवाना होवुन कुदळे यांच्या पत्र्याचे शेडजवळ वडगाव पठार वडगाव पुणे येथे येवुन आडबाजुस थांबुन बातमीप्रमाणे खात्री करता बातमीतील वर्णनाचा इसम सदर ठिकाणी उभा असल्याचे दिसुन आल्याने त्यास स्टाफच्या मदतीने आहे त्या परिस्थितीत ताब्यात घेवुन पोउपनि संतोष भांडवलकर यांनी त्यास त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव व पत्ता सोमनाथ भिमा चांदणे वय २१ वर्षे रा. रेणुकामाता मंदीराजवळ वडगाव पठार वडगाव बुद्रुक पुणे असे असल्याचे सांगितले. त्यास सदर ठिकाणी थांबण्याचे कारण विचारले असता त्यांने उडवाउडवीची व असमाधानकारक उत्तरे देवु लागल्याने तो काहीतरी दखलपात्र गुन्हा करण्याचे उद्देशानेच थांबला असल्याची आमची खात्री झाल्याने आम्ही लागलीच सोबतचे पंचासमक्ष त्याची अंगझडती घेता त्याचे जवळ ४०,०००/- रु. किं.चे एक गावठी पिस्टल व २,०००/- रु. किं.चे दोन जिवंत काडतुसे मिळुन आल्याने त्यास अटक करण्यात आली आहे. दाखल गुन्ह्यांचा पुढील तपास पोलीस उप-निरीक्षक संतोष भांडवलकर हे करीत आहेत. सदरची कामगिरी मा. अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर, श्री. प्रविणकुमार पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त परी.-३, पुणे श्री. संभाजी कदम, मा. सहा पोलीस आयुक्त, सिंहगड रोड विभाग श्री. अजय परमार, सिंहगड रोड पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. दिलीप दाईंगडे पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. उत्तम भजनावळे यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक श्री. सचिन निकम, पोलीस उप निरीक्षक, संतोष भांडवलकर, आबा उत्तेकर, पोलीस अंमलदार संजय शिंदे, उत्तम तारु, आण्णा केकाण, राहुल ओलेकर, अमोल पाटील, विनायक मोहीते, देवा चव्हाण, सागर शेडगे, विकास पांडुळे, विकास बांदल, गणेश झगडे, निलेश भोरडे यांनी केली.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page