गंभीर गुन्हयातील फरार पाहीजे विधीसंघर्षग्रस्त बालकास घेतले ताब्यात..!

वरिष्ठांच्या आदेशाने दिनांक १०/०३/२०२६ रोजी गुन्हे शाखा, युनिट ३ कडील पोलीस अमंलदार पाहिजे आरोपी व रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक करुन कारवाई करणेकरीता सिंहगड रोड, नांदेड सिटी, नन्हे पोलीस स्टेशन हददीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अमंलदार कैलास लिम्हण व योगेश झेंडे यांना गोपनिय बातमीदारामार्फत माहिती मिळाली कि, सिंहगड रोड पोलीस स्टेशन गुर नं. ६७/२०२६ भारतीय न्यास संहितचे कलम १०९ (१), ११८(२),११५(२),१८९(२),१८९ (४),१९०, १९१ (२),१९१ (३) सह शस्त्र अधि. ४,२५,२७, महाराष्ट्र पोलीस अधि. ३७ (१) (३), १३५, क्रि. लॉ.अ.अॅक्ट ७ प्रमाणे दि. २२/०२/२०२६ रोजी दाखल असलेल्या गुन्हयातील १७ वर्षे वयाचा पाहिजे विधीसंघर्षग्रस्त बालक हा त्याचे राहते घरी नंदी बावरा मित्र मंडळासमोर, धायरी, पुणे येथे आल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्याने गुन्हे शाखा युनिट ०३ कडील पथकाने सापळा रचुन गुन्हयातील पाहिजे विधीसंघर्ष ग्रस्त बालक यास शिताफिने ताब्यात घेतले व त्यांच्याकडे गुन्हयाचे अनुषंगाने प्राथमिक चौकशी केली असता गुन्हयात सहभाग असल्याचे कबुल केले. त्यांचा गुन्हे अभिलेख तपासला असता रेकॉर्डवरील असल्याची माहिती समजली आहे.

Advertisement

सदरची कारवाई ही मा.अपर पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा, पुणे शहर, श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप-आयुक्त, आर्थिक व सायबर, (अतिरीक्त कार्यभार) श्री. विवेक मासाळ, मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे-३, श्री शंकर खटके, यांचे मार्गदर्शनाखाली युनिट ०३ कडील श्री प्रशांत अन्नछत्रे यांचे सुचनेनुसार युनिट-०३, गुन्हे शाखा पथकातील सहा. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, पोलीस उप निरीक्षक गणेश फरताडे, पोलीस अमंलदार शिंदे, लिम्हण, किशोर शिंदे, गुन्ला, झेंडे यांनी केली आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page