आगामी पुणे महानगरपालिका निवडणूक २०२६ अनुषंगाने हद्दीत रूट मार्चचे आयोजन..!

दिनांक १३/०१/२०२६ रोजी सकाळी ११.०० ते १२.०० वाजेपर्यंत हडपसर पोलीस स्टेशन हद्दीत आगामी पुणे महानगरपालिका निवडणूक २०२६ अनुषंगाने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी याकरिता रूट मार्चचे आयोजन करण्यात आले होते.

सदर रूट मार्च मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ६, पुणे शहर डॉ. राजकुमार शिंदे, यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग, पुणे श्री. अतुलकुमार नवगिरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, हडपसर पोलीस स्टेशन श्री. संजय मोगले, व श्री. निलेश जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली पार पडला.

Advertisement

हा रूट मार्च हडपसर गाडीतळ मंत्री मार्केट क्षेत्रीय कार्यालय पांढरे मळा हडपसर गावठाण मार्गावरून काढण्यात आला. हडपसर भाजी मंडई हडपसर मुंढवा गांधी चौक भाजी मंडई परिसर या

सदर रूट मार्च दरम्यान हडपसर पोलीस स्टेशनकडील ०२ पोलीस निरीक्षक, १० सहायक पोलीस निरीक्षक / पोलीस उपनिरीक्षक व १५० पोलीस अंमलदार तसेच एसआरपीएफ प्लाटून, होमगार्ड हे उपस्थित होते.

निवडणूक दिनांक १५ जानेवारी २०२६ रोजी होणार असल्याने त्या पार्श्वभूमीवर, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच समाजकंटकांवर वचक ठेवण्यासाठी सदर रूट मार्च व आवश्यक तो पोलीस बंदोबस्त याची आखणी व नियोजन करण्यात आलेले आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page