कोंढव पोलीस ठाणे, पुणे शहर हद्दीमध्ये अवैध दारू धंदयावर छापा १ कोट रूपये जप्त..!

महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुक सन २०२६ च्या अनुषंगाने कायदा, सुव्यवस्था व अवैध धंदयांच्या अनुषंगाने कोंढवा पोलीस ठाणेकडील तपास पथकातील पोलीस अधिकारी सपोनि अफरोज पठाण व पोलीस अंमलदार कोंढवा पोलीस ठाणे हद्दीमध्ये गस्त करीत असताना पोलीस हवालदार अमोल हिरवे व पोलीस शिपाई केशव हिरवे यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मा तुळजा भवानी निवास, काकडे वस्ती, गल्ली नं ०२, चर्च चे समोर, कोंढवा बु., पुणे येथे इसम नामे देवासिंग दादासिंग जुनी, वय २३ वर्षे, रा. काकडे वस्ती, गल्ली नं २, चर्च चे समोर, कोंढवा, बु., पुणे व दिलदारसिंग दादासिंग जुनी, वय ३५ वर्षे रा. सदर हे दोघे भाऊ व त्यांची आई नामे मदरीकौर दादासिंग जुनी, वय ५३ वर्षे हे कोणताही परवाना नसताना अनाधिकाराने त्यांचे राहते घरात त्यांचे ओळखीच्या लोकांना गावठी हातभट्टीची दारू, देशी दारू तसेच विदेशी दारूची विक्री करीत आहे, अशी बातमी मिळाल्याने सदर ठिकाणी जावून छापा टाकला असता तेथे घरामध्ये लपवून ठेवलेली खालीलप्रमाणे अवैध दारू मिळुन आली.

१. १,६००/- रू. किंमतीची ४ लिटर गावठी हातभट्टीची दारू.

२. ६,१६०/- रू. किंमतीची टॅगोपंच देशी दारूच्या ७७ बाटल्या (सर्व बाटल्या १८० मिली.).

३. १,७५,७४०/- रू. किंमतीच्या त्यामध्ये इंपिरिअल ब्लू व्हिस्की १८३ बाटल्या, क्लासिक गोल्ड व्हिस्की ३२ बाटल्या,

व्हल्कन ब्लू व्हिस्कीच्या ३८ बाटल्या, मॅकडॉल नं. १ व्हिस्कीच्या २२० बाटल्या, डर्बी स्पेशल व्हिस्कीच्या ४३ बाटल्या, रॉयल स्टॅग व्हिस्कीच्या २२४ बाटल्या, ओल्ड मंक रम ४८ बाटल्या (सर्व बाटल्या १८० मिली.), रॉयल स्टॅग व्हिस्कीच्या ९० मिलीच्या २० बाटल्या.

४. २८,०००/- रू. किंमतीच्या ३५ लीटरचे दोन हत्ती नग त्यामध्ये गावठी हातभट्टीची दारू.

५. १,४१,०५०/- रू. दारू विक्रीतून मिळालेली रोख रक्कम.

असा एकुण ३,५२,५५०/- रू. किंमतीचा माल मिळुन आल्याने तो जप्त करून नमूद आरोपीविरूध्द कोंढवा पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक. १००३/२०२५, महाराष्ट्र प्रोव्हि अधिनियम ६५ (ई) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Advertisement

वर नमुद माल जप्त केल्यानंतर तेथील कपाट उघडण्याकरीता मदरीकौर दादासिंग जुनी यांना सांगितले असता त्यांनी कपाट उघडण्यास टाळाटाळ केली. त्याबाबत अधिक संशय आल्याने व सध्या पुणे मनपा निवडणुकीची आचार संहिता सुरू असल्याने लागलीच मा. वरिष्ठांनी निवडणुक अधिकारी यांना सदरबाबत कळविले व सदर ठिकाणी पाचारण होण्यास सांगितले. त्या नुसार सदर एफ.एस.टी. मधिल शासकीय अंमलदार यांना पंच म्हणून घेवून त्यांच्या समक्ष कपाटाचे तपासणी केली असता त्यामध्ये ९९,४४,९००/- रू. रोख रक्कम मिळुन आली. तसेच अवैध दारू विक्रीतून मिळालेली १,४१,०५०/- रू. रोख रक्कम, अशी एकुण १,००,८५,९५०/- रू. रोख रक्कम व ३,५२,५५०/- रू. किंमतीचा प्रोव्हि माल जप्त करण्यात आला आहे.

जप्त केलेली ९९,४४,९००/- रू. रोख रक्कम नमूद आरोपींनी कोठून आणली आहे, कोठून प्राप्त केली आहे, सदर रकमेचा तो कोणत्या कारणाकरीता उपयोग करणार होते याबाबत अधिक तपास सपोनि अफरोज पठाण हे करीत आहेत.

सदरची कामगिरी हि अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर, रंजनकुमार शर्मा पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, मनोज पाटील, अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, राजलक्ष्मी शिवणकर, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-५, पुणे शहर, नम्रता देसाई, सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली कुमार घाडगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कोंढवा पोलीस ठाणे, पुणे शहर, नवनाथ जगताप, पोलीस निरीक्षक (गुन्हे), कोंढवा पोलीस ठाणे, पुणे शहर, अफरोज पठाण, सहा. पोलीस निरीक्षक (तपास पथक), कोंढवा पोलीस ठाणे, पुणे शहर, रविंद्र गावडे, पोलीस उप निरीक्षक, कोंढवा पालीस ठाणे, पुणे शहर, सहा. पोलीस फौजदार शरद वाकसे, पोलीस हवालदार अमोल हिरवे, पोलीस हवालदार गोरख चिनके, पोलीस हवालदार सुभाष जरांडे, पोलीस अंमलदार केशव हिरवे, पोलीस अंमलदार रशिद शेख, पोलीस अंमलदार स्वागत पळसे, पोलीस अंमलदार पुष्पेंद्र चव्हाण, पोलीस अंमलदार रियाज पटेल, पोलीस अंमलदार राहुल रासगे, पोलीस अंमलदार समीर आवळे, पोलीस अंमलदार राहुल थोरात, पोलीस अंमलदार निलेश कामथे, पोलीस अंमलदार अमित सुर्यवंशी, महिला पोलीस अंमलदार अयोध्या चेचर, महिला पोलीस अंमलदार अंजली मोरे यांनी केली आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page