पुण्यात हेलिकॉप्टर कोसळून मोठी दुर्घटना; ३ जणांचा मृत्यू

पुणे– पुण्यातील बावधन बुद्रुक परिसरात हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात दोन वैमानिक आणि एका अभियंत्यासह तिघांचा मृत्यू झाला आहे. कॅप्टन पिल्लई आणि कॅप्टन परमजीत सिंग अशी मृत वैमानिकांची नावे आहेत. तर प्रीतम भारद्वाज असे अभियंत्याचे नाव आहे. सकाळी पाऊणे सातच्या सुमारास ही दुर्घटना घडली असून सकाळच्या सुमारास दाट धुके असल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
पुण्यातील ऑक्सफर्ड काऊंटी रिसॉर्टच्या हेलिपॅडवरुन या हेलिकॉप्टरने सकाळी साडेसात वाजता उड्डाण घेतलं होतं. हे उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या तीन मिनिटात या हेलिकॉप्टरचा अपघात झाला. ऑक्सफर्ड काऊंटी रिसॉर्ट आणि एचईएमआरएल ही या केंद्र सरकारच्या संस्थेदरम्यान असलेल्या डोंगराळ भागात हेलिकॉप्टरला अपघात झाला.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




