अशोक चव्हाणांना मोठा धक्का, ‘या’ विश्वासू नेत्याने सोडली साथ

नांदेड : अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर नांदेडमधील त्यांच्या अनेक समर्थकांनी देखील काँगेसला सोडचिठ्ठी दिली होती. पण आता अशोक चव्हाण यांचे अनेक शिलेदार काँगेसमध्ये प्रवेश करत आहेत. अशातच आता अशोक चव्हाण यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. त्यांचे जवळचे मित्र डी. पी सावंत यांनी काँग्रेसकडून विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
आता डी पी सावंत यांनी नांदेड उत्तर मधून काँगेसकडे उमेदवारी मागितली असून जिल्हा काँग्रेस पक्ष कार्यालयात त्यांनी अर्ज दाखल केलाय. अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्यानंतर काँग्रेसच्या असंख्य पदाधिकारी आणि नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता अनेक जन त्यांच्यापासून दूर होत आहेत. भाजपमध्ये गेलेले माजी महापौर जयश्री पावडे, माजी उपमहापौर सतीश देशमुख आणि माजी जिल्हा परिषद सदस्य मनोहर शिंदे यांनी काँग्रेसकडून थेट उमेदवारीच मागितली आहे.
अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर डी.पी सावंत काँगेस पक्षात सक्रिय नव्हते. त्यांनी पक्ष सोडला नव्हता. मात्र, आपली भूमिकादेखील स्पष्ट केली नव्हती. आता मात्र त्यांनी काँगेसकडे उमेदवारी मागितली आहे. त्यामुळे, हा अशोक चव्हाणांसाठी धक्का मानला जात आहे.
जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर




