कर्जत रायगड येथे फायरींग करुन खुनाचा प्रयत्न करणा-या आरोपीस केले जेरबंद..!

दि.०१/१०/२०२५ कर्जत पोलीस स्टेशन रायगड येथे मिळकतीचे वादावरुन खुनाचा प्रयत्न करुन अग्निशस्त्र मधुन फायरिंग केलेबाबत गुन्हा रजि क्रमांक २५३/२०२५ भा.न्या.सं.क. १०९,१८९(१,१८९(२), १८९(४),१९१(२),१९१(३),१९०,१३१ भारतीय शस्त्र अधिनियम ३,२५,२७ अन्वये गंभीर गुन्हा करुन आरोपी अनेक दिवसापासून फरारी झाला होता. सदर आरोपी पुणे शहरातील असलेबाबत वरिष्ठांकडुन गुन्हे शाखा युनिट-२ प्रभारी संतोष सोनवणे यांना माहिती प्राप्त झाली होती. त्याप्रमाणे गुन्हे शाखा युनिट २ कडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे पथक तयार करणेत आले.

Advertisement

दि.२९/११/२०२५ रोजी गुन्हे शाखा युनिट २ कडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार फायरींग केलेल्या गंभीर गुन्हयातील पाहिजे आरोपीचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार शंकर कुंभार, उज्वल मोकाशी व विजयकुमार पवार यांना त्यांचे बातमीदारमार्फतीने बातमी मिळाली की गुन्हयातील पाहिजे आरोपी हा वडारवाडी पुणे भागात फिरत आहे. त्यानंतर युनिट प्रभारी संतोष सोनवणे यांचे मार्गदर्शनाखाली युनिट मधील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी वडारवाडी पुणे येथे जावून गंभीर गुन्हयातील पाहिजे आरोपी नामे सिध्दार्थ प्रभाकर केंगार वय २४ वर्ष रा.पी एम सी कॉलनी वडारवाडी पुणे यास पुढील कायदेशीर कारवाई कामी कर्जत पोलीस स्टेशन जि. रायगड कडील पथकाकडे ताब्यात देण्यात आले आहे. सदर आरोपी रेकार्डवरील गुन्हेगार आहे.

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री पंकज देशमुख, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री. निखील पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त गुन्हे-१ श्री. विजय कुंभार यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, सपोनि कवठेकर, सपोनि अमोल रसाळ, पोलीस अंमलदार शंकर कुंभार, उज्वल मोकाशी व विजयकुमार पवार, संजय जाधव, सर्जेराव सरगर, शंकर नेवसे, साधणा ताम्हाणे, योगेश मांढरे, संजय आबनावे, विशाल दळवी, गणेशथोरात, अजीम शेख, सददाम तांबोळी असे गुन्हे शाखा युनिट २ पथकाने केली आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page