खुनाचा प्रयत्नातील ३ आरोपींना ४ तासात केले जेरबंद..!

दिनांक १७/०९/२०२५ रोजी रात्रौ ११/३० वा चे सुमारास यातील फिर्यादी यांना त्यांचे मेहुण्याचा मुलगा व त्याचे साथीदारांनी जुने वादातुन लोखंडी हत्याराने डोक्यात, हातावर मारुन गंभीर जखमी केले म्हणुन भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गु.र.नं. ४१५/२०२५ भा.न्या.सं.क. १०९, ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्यामुळे भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल खिलारे यांनी तात्काळ तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप-निरीक्षक निलेश मोकाशी व पोलीस अंमलदार यांना आरोपीचा शोध घेणेबाबतच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार तपास पथकाचे पोलीस अंमलदार मितेश चोरमोले व संदीप आगळे यांना मिळालेल्या गोपनीय बातमीवरुन आरोपी नामे १) प्रसाद भारत निकाळजे, वय १८ वर्षे ८महीने, रा.स.नं. १४७, खुळेवाडी, चंदननगर, मराठी शाळेजवळ, पुणे, २) यश विनोद निकाळजे, वय २३ वर्षे, रा. सदर ३) समीर इंद्रजीत थापा, वय १८ वर्षे ३ महीने, रा. सदर यांचा शोध घेतला ते खुळेवाडी, चंदननगर येथे मिळुन आल्याने त्यांना नमुद गुन्हयात अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उप-निरीक्षक प्रियंका निकम हे करीत आहेत. सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे श्री. राजेश बनसोडे, मा. पोलीस उप-आयुक्त परिमंडळ-२ पुणे शहर श्री. मिलींद मोहीते, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे शहर श्री. राहुल आवारे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल खिलारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. जितेंद्र कदम, पोलीस उप-निरीक्षक निलेश मोकाशी, प्रियंका निकम, पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, संदीप आगळे, सचिन सरपाले, प्रदीप चव्हाण, सागर बोरगे, अभिनय चौधरी, महेश बारवकर, मंगेश पवार, निलेश खैरमोडे, मंगेश गायकवाड, किरण साबळे व अवधुत जमदाडे यांच्या पथकाने केली आहे.




