भारतात अवैधरित्या वास्तव्यास असलेल्या ०५ बांगलादेशी महिलांना, बुधवार पेठ रेड लाईट एरिया मधील छापाकारवाई मध्ये पकडण्यात आले यश..!

मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. अमितेश कुमार यांनी अवैद्यरित्या बांगलादेशी महिला- पुरुष यांचा शोध घेवुन त्यांचेवर कारवाई करण्याबाबत आदेश झाले होते.
त्या अनुषंगाने फरासखाना पोलीस स्टेशन येथील प्रभारी अधिकारी श्री. प्रशांत भस्मे, यांच्या गोपनिय बातमीचे अनुषंगाने तपास पथक तसेच ए.टी.सी. पथकातील अधिकारी व अंमलदार यांना फरासखाना पोलीस स्टेशन हद्दीमधील बुधवार पेठ पुणे येथील रेड लाईट एरिया मधील मालाबाईचा वाडा, बुधवार पेठ येथे अवैद्यरित्या बांगलादेशी महिला-पुरुष असल्या बाबत माहिती प्राप्त झाली होती. त्या अनुषांगाने सदर भागात शोध घेवुन कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश देवुन, दि. १८/०७/२०२५ रोजी फरासखाना पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. प्रशांत भस्मे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री. अजित जाधव पोनि (गुन्हे), श्री. उत्तम नामावडे म.स.पो.नि. शितल जाधव, पोलीस उप-निरीक्षक अरविंद शिंदे, म. पोलीस उप-निरीक्षक जाधव, सपोफौ कृष्णा निढाळकर, सपोफौज मोकाशी, व पोलीस अंमलदार तेलंगे, नांगरे, पासलकर, राठोड, सोनुने, होळकर मपोअं पुकाळे, मोहिते, शिंदे, करदास, भोईटे, शेख, कवठे, यांचेसह दोन पथके तयार करुन, मालाबाईचा वाडा, बुधवारपेठ पुणे येथील रेड लाईट एरीया मध्ये अचानक छापा टाकला असता त्यामध्ये ५ बांगलादेशी महिला मिळुन आल्या.
त्यांना ताब्यात घेवुन त्यांची कसुन चौकशी केली असता, त्या अवैद्यरित्या विनापरवाना भारतात येवुन, स्वखुशीने वेश्याव्यवसाय करुन, त्यांची उपजिवीका भागवित असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यांना ताब्यात घेवुन त्या बांगलादेशी असल्याचे पुरावे गोळा करुन, त्यांचेवर कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे. त्यांची नावे खालील प्रमाणे. १) जहानारा मजिद शेख वय ४५ वर्षे रा. मालाबाई वाडा बुधवारपेठ, पुणे मुळगाव-लक्ष्मणपुर शारशा, जैशोर, खुलना, बांगलादेश. २) शिल्पी बेगम रबिउल्ला शेख वय २८ वर्षे रा. मालाबाई वाडा बुधवारपेठ पुणे, रा मुळगाव बेरा राधुंगाघर, पोस्ट तेघरिया १३११, केरानीगंज, ढाका, बांगलादेश, ३) नुसरात जहान निपा वय २८ वर्षे रा. मालाबाई वाडा बुधवारपेठ पुणे, मुळगाव-ग्राम.मैजपारा,पाँचरुखी, बाजार, १४६०, थाना- अराईहजार, जिल्हा-नारायाणगंज, देश-बांगलादेश, ४) आशा खानामइयर अली वय ३० वर्षे रा. सध्या रंगा शेठचौक सतवाल मंदीर कात्रज पुणे, मुळगाव ग्राम. परुल बाजार-९२२०जिल्हा – नोडाई, थाना- कालिया, देश-बांगलादेश, ५) शिल्पी खालेकमिया अक्तर वय २८ वर्षे रा. मालाबाई वाडा
बुधवारपेठ पुणे, मुळगाव-ग्राम. मुलीकपुर, पोस्ट रायपुरा, थाना रायपुरा, जिल्हा. नरसिंगदी १६३०, देश बांगलादेश अशा मिळुन आलेल्या आहे.
सदरच्या महिला बांगलादेश येथुन, छुप्या पध्दतीने बॉर्डर पारकरुन अवैधरित्या भारतात येत होत्या, त्यानंतर त्या पश्चिम बंगाल येथील रहिवाशी असल्याचे सांगुन, पुणे येथे रेड लाईट एरिया मध्ये स्वखुशीने वेश्या व्यवसाय करीत असल्याचे चौकशीदरम्यान निदर्शनास आलेले आहे.
सदरची कामगिरी ही मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. अमितेश कुमार मा. पोलीस सह आयुक्त, पुणे शहर श्री. रंजनकुमार शर्मा मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री. राजेश बनसोडे मा. पोलीस उप-आयुक्त, परि १ पुणे शहर श्री. कृषिकेश रावले मा. सहाय्यक पोलीस आयुक्त फरासखाना विभाग, श्रीमती अनुजा देशमाने यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. प्रशांत भस्मे, पो.नि. (गुन्हे) श्री. अजित जाधव, पो.नि. (गुन्हे) श्री. उत्तम नामवाडे, म.स.पो.नि. शितल जाधव, पोलीस उप-निरीक्षक अरविंद शिंदे, पुजा जाधव, सपोफौ मेहबुब मोकाशी, निढाळकर, पुरुष/महिला पोलीस अंमलदार, मनिषा पुकाळे, गजानन सोनुने, नितीन तेलंगे, तानाजी नांगरे, प्रविण पासलकर, महेश राठोड, चेतन होळकर, राजश्री मोहिते, राणी शिंदे, अनिता करदास, अंजली भोईटे, मनिषा कवठे, इफ्तेसाम शेख यांनी केलेली आहे.




