किरणा दुकानामध्ये गुटखा व सिगारेट विकणा-यावर केली कारवाई..!

दि.२५/०६/२०२५ रोजी आंबेगाव पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलींग करत असताना आंबेगाव ब्रु, व कात्रज या ठिकाणी असलेल्या किराणा दुकानात व टपरीवर महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला आर.एम.डी, विमल पान मसाला गुटखा विक्रीसाठी साठा करुन ठेवला असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने आंबेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी आंबेगाव पोलीस स्टेशन हददीत ४ ठिकाणी जाऊन छापा टाकून कारवाई केली. सदर कारवाई दरम्यान एकूण ४९,९००/-रु.किं.चा गुटखा व सिगारेट जप्त करण्यात आला सदर कारवाईत मालाची विक्री करणेकरीता साठा करून ठेवणारे १) राहुल प्रकाश संचेती, वय ३२ वर्षे, रा. शंभुराजे मित्र मंडळाच्या जवळ आंबेगाव ब्रु. पुणे २) प्रमोद प्रकाश संचेती, वय ३६ वर्षे, रा.सदर ३) रविंद्र राजकुमार वाकडे, वय २६ वर्षे, रा. संतोष नगर कात्रज, पुणे. ४) सुनिल दगडू सुरवसे, वय २४ वर्षे, रा. वडगाव ब्रु. पुणे. ५) प्रशांत बच्चा कुलाल, वय ४१ वर्षे, रा.आंबेगाव खु.पुणे. यांना ताब्यात घेवून त्यांचेविरुध्द आंबेगांव पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. १३२/२०२५, भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १२३, २२३, २७४, २७५ अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ चे कलम ३०(२) (अ),२६ (२) (१), २६ (२) (४) अंतर्गत कलम ५९, जाहिरातीस प्रतिबंध आणि वाणिज्य उत्पादन पुरवठा अधिनियम २००३ चे कलम ७ (२), २० (२) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून त्यांना नमूद गुन्हयात अटक करण्यात आली आहे. सदरची कारवाई ही मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे शहर श्री. राजेश बनसोडे, मा. पोलीस उप-आयुक्त परिमंडळ २ पुणे शहर श्रीमती स्मार्तना पाटील, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग, पुणे श्री. राहुल आवारे यांचे मार्गदर्शनाखाली आंबेगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शरद झिने, पोलीस निरीक्षक गुन्हे श्री. गजानन चोरमले, तपास पथकाचे पोलीस उप-निरीक्षक मोहन कळमकर, पोलीस अंमलदार शैलेंद्र साठे, हनुमंत मासाळ, चेतन गोरे, बाबासो पाटील, निलेश जमदाडे, अजय कामठे, हरीष गायकवाड, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, प्रमोद भोसले, नितीन कातुर्डे, अविनाश रेवे, योगेश जगदाळे, सुभाष मोरे, यांच्या पथकाने केली आहे.




