चोरीस गेलेल्या ५०० किलो तांब्याच्या तारा जप्त करुन तीन आरोपी जेरबंद लोणीकाळभोर पोलीसांची कामगिरी..!

दि.०६/०६/२०२५ रोजी फिर्यादी यांनी त्यांचा टेम्पो हा मौजे थेऊर ता. हवेली, जि. पुणे या गावाचे हद्दीतील जय मल्हार हॉटेल समोरील रोडचे बाजुला मोकळया जागेमध्ये लावुन ठेवला होता. सदर टेम्पोमध्ये जुन्या जळालेल्या तांब्याच्या तारांचे बंडल ने भरलेली एकुण ५५ पोते ठेवले होते. दि.०७/०६/२०२५ रोजी सकाळी ०६/३० वा.चे फिर्यादी हे त्यांचे टेम्पोजवळ आले असता त्यांना त्यांचे टेम्पोमधील तांब्याच्या तारांच एकुण ९ पोते कोणीतरी अज्ञात चोरटयांनी चोरुन नेल्याचे दिसुन आले. सदर ९ पोत्यांमध्ये एकुण ४९५ किलो वजानाच्या व ३,०१,९५०/- रुपये किं.च्या तांब्याच्या तारा होत्या. त्याचोरटयांनी चोरुन नेलेबाबत त्यांनी लोणी काळभोर पोलीस ठाणेस तक्रार नोंदवीली होती. सदरबाबत लोणी काळभोर पोलीस ठाणेस अज्ञात आरोपींविरुध्द गु.र.नं.२५०/२०२५ भा. न्या. संहिता कलम ३०३ (२), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करणेत आला होता.

Advertisement

सदर गुन्हा दाखल झाल्याचे नंतर लोणी काळभोर पोलीस ठाणेकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र पन्हाळे यांनी गुन्हा उघडकीस आणण्याचे दृष्टीने पोलीस ठाणे स्तरावर स्वतंत्र २ टिम तयार करुन त्यांना सदर गुन्हयातील आरोपीतांचा शोध घेणेबाबत आदेशीत केले. त्यानुसार तपास पथकात नेमणुकीस असलेले पोलीस अंमलदार प्रदिप गाडे व राहुल कर्डीले यांना सदर गुन्हयातील आरोपींबाबत त्यांचे बातमीदारांमार्फत खात्रीशिर बातमी मिळाली. त्यानुसार त्यांनी सदर आरोपींचा शोध घेवुन त्यांना लोणी काळभोर पोलीस ठाणेकडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे मदतीने सापळा रचुन दि.१०/०६/२०२५ रोजी ताब्यात घेतले. सदर आरोपीतांची नावे १) सुरज शाम जाधव वय १९ वर्षे रा. चव्हाण वस्ती, थेऊर ता. हवेली, जि. पुणे २) यश अजित सावंत वय २१ वर्षे रा. चव्हाणवस्ती, थेऊर ता हवेली जि. पुणे ३) महेश बस्वराज पुजारी वय २२ वर्षे रा. सदर अशी आहेत. नमुद आरोपीतांनी सदर गुन्हा केल्याचे कबुल केल्याने त्यांना लोणी काळभोर पोलीसांनी दि.१०/०६/२०२५ रोजी अटक केली असुन त्यांचेकडुन गुन्हयातील चोरीस गेलेल्या एकुण ४९५ किलो वजानाच्या व ३,०१,९५०/-रु.कि.च्या तांब्याच्या तारा जप्त करणेत आलेल्या आहेत.

सदर गुन्हा अज्ञात आरोपीं विरुध्द दाखल असताना, तसेच आरोपीतांबाबत कोणत्याही प्रकारची माहिती नसताना लोणी काळभोर पोलीसांनी अज्ञात चोरटयांचा शोध घेवुन, त्यांची नावे गुन्हयात निष्पन्न करुन, त्यांचेकडुन गुन्हयातील चोरीस गेलेला संपुर्ण माल जप्त केला आहे.

सदरची कागगिरी मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०५, डॉ. राजकुमार शिंदे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग, श्रीमती अनुराधा उदमले यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र पन्हाळे, पोलीस उप निरीक्षक अनिल जाधव, पोलीस अंमलदार जाधव, सातपुते, वणवे, भोसले, माने, जगदाळे, देवीकर, बारगजे, माने, गाडे, कर्डीले, सोनवणे, शिरगिरे, दडस.. पाटील, कुदळे, विर, म. पोलीस अंमलदार थोरात यांनी केली.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page