विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेवुन त्याचेकडुन ०१ गावठी पिस्टल व ०३ जिवंत काडतुस केले जप्त..!

दिनांक १९/१२/२०२५ रोजी गुन्हे शाखा, युनिट ३ चे सहा पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, सहा पोलीस उपनिरीक्षक पंढरीनाथ शिंदे, सहा पोलीस उपनिरीक्षक मुकुंद तारु व पोलीस अमंलदार असे वरिष्ठांच्या आदेशाने आगामी पुणे महानगरपालिका निवडणुक २०२५ च्या अनुषंगाने पाहिजे आरोपी व रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक करुन कारवाई करणेकरीता सिंहगड रोड, नादेंड सिटी, नन्हे पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अमंलदार पंढरीनाथ शिंदे व तुषार किंद्रे यांना गोपनिय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, एक विधीसंघर्षित बालक अवैधरित्या बेकायदेशिरपणे गावठी पिस्टल व जिवंत काडतुस बाळगलेले असुन तो मते प्लॉट, नन्हे धायरी रोड, नन्हे पुणे येथे थांबलेला आहे. सदरची बातमी मिळताच तात्काळ नमुद पोलीस आधिकरी व पोलीस अंमलदार सदर नमुद ठिकाणी रवाना झाले व सापळा रचुन शिताफिने विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले व त्याच्याकडुन त्याने अवैधरित्या, बेकायदेशिरपणे बाळगलेले ०१ गावठी पिस्टल व ०३ जिवंत काडतुस जप्त केले. पुढील कायदेशिर कारवाईकरीता सदर विधीसंघर्षित बालकाला नन्हे पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Advertisement

सदरची कामगिरी ही मा. अपर पोलीस आयुक्त. (गुन्हे शाखा) पुणे शहर, श्री. पंकज देशमुख मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, पुणे शहर श्री. निखिल पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे-१, पुणे शहर श्री. विजय कुंभार, यांचे मार्गदर्शनाखली सहा पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, सहा पोलीस उप-निरीक्षक पंढरीनाथ शिंदे, सहा पोलीस उप-निरीक्षक मुकुंद तारु, पोलीस अमंलदार कैलास लिम्हण, मोहम्मद शेख, किशोर शिंदे, अमित बोडरे तुषार किंद्रे, पुरषोत्तम गुन्ला व योगेश झेंडे यांनी केली

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page