चैन स्नॅचिंग करणारे सराईत आरोपी जेरबंद वाघोली सह पुणे शहर कडील दोन, पुणे ग्रामीण कडील एक असे गुन्हे उघड करून व नाशिक शहर कडील तीन गुन्हयातील एक पाहिजे आरोपी ताब्यात..!

. पोलीस उप आयुक्त, परीमंडळ ०४ श्री. हिंम्मत जाधव, मा. सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग श्रीमती प्राजंली सोनवणे व वरीष्ठ पोलीस निरीक्षक वाघोली पोलीस स्टेशन श्री. युवराज हांडे यांचे मार्गदर्शनाखाली, वाघोली पोलीस स्टेशन गु.र.नं २१९/२०२५, भा. न्या. संहिता कलम ३०९ (४), ३(५) प्रमाणे दाखल गुन्हयाचा तपास चालू असताना पोलीस अंमलदार साईनाथ रोकडे, दिपक कोकरे यांनी गोपनीय बातमीदार व तांत्रिक विश्लेषणच्या आधारे दाखल गुन्हे उघडकीस आणून गुन्ह्यातील सराईत आरोपी प्रशांत संतविजय यादव वय १९, रा- शिवाजीनगर सातपुर नाशिक, ता. नाशिक जि. नाशिक याचेकडे तपास केला असता त्याचा मित्र कुणाल विश्वनाथ साबळे वय २१ वर्षे रा. स्वामी नगर, सिडको, नाशिक याचे साथीने दौंड येथून दुचाकी चोरी करून वाघोली पो स्टे हद्दीत चैन स्नॅचिंग केली. तसेच त्याचा दुसरा मित्र ताजीम सल्ला उददीन अन्सारी वय-२०, रा. सातपुर अशोकनगर, नाशिक, याचे साथीने त्याच चोरीच्या दुचाकीवरून कोरेगाव पार्क व विमाननगर परिसरात चैन स्नॅचिंग करून त्यातील चोरीचा माल त्यांचे मित्र १) संजोग संतोष भांगरे वय १८, रा. सातपुर शिवाजीनगर, नाशिक, विठठल रुक्मिणी मंदीर, नाशिक, २) मनोज उदय पाटील, वय ३१ रा- सातपुर शिवाजीनगर, स्नेहल रो हाऊस, विठठल रुक्मिणी मंदीरा शेजारीता. नाशिक यांचेकडे दिल्याचे सांगितलेने. खालील गुन्हे उघकीस आले आहेत.

१) वाघोली पोलीस स्टेशन गु.र.नं. २१९/२०२५ बी.एन.एस. कलम ३०९ (४), ३(५) प्रमाणे

२) विमानतळ पोलीस स्टेशन गु.र.नं. २४६/२०२५ भा न्या सं क ३०४(२), ३(५) प्रमाणे

Advertisement

३) कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन गु.र.नं. ५१/२०२५ भा न्या सं क ३०९ (४), ३ (५) प्रमाणे

४) दौंड पोलीस स्टेशन (पुणेग्रामीण) गु.र.नं. ३६९/२०२५ भा.न्या.सं.क ३०३ (२) प्रमाणे

तसेच आरोपी ताजीम सल्लाउददीन अन्सारी हा खालील पोलीस स्टेशनकडे पाहिजे आरोपी आहे

५) गंगापूर पोलीस स्टेशन (नाशिक शहर) गु.र.नं. ११३/२०२५ बी.एन.एस. कलम ३०९ (४), ३(५)

६) म्हसरूळ पोलीस स्टेशन (नाशिक शहर) गु.र.नं. १०२/२०२५ बी.एन.एस. कलम ३०९ (४), ३(५)

७) सातपूर पोलीस स्टेशन (नाशिक शहर) गु.र.नं. १०१/२०२५ बी.एन. एस. कलम ३१० (२), ३३१,३५२,३५१(२) (३)

यातील आरोपी १) ताजीम सल्लाउददीन अन्सारी २) संजोग संतोष भांगरे ३) मनोज उदय पाटील, यांना पूढील कार्यवाही कामी विमानतळ पो स्टे कडे देण्यात आले असून आरोपी १) प्रशांत संतविजय यादव २) कुणाल विश्वनाथ साबळे यांना अटक करून त्यांचेकडून सोने, एक दुचाकी, दोन मोबाईल असे १,८९,०००/- रु. किं.चा. मुद्देमाल जप्त केला असून अधिक तपास चालू आहे.

सदरची कामगीरी मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, श्री. मनोज पाटील मा. पोलीस उप आयुक्त, परीमंडळ ४. पुणे शहर, श्री. हिम्मत जाधव, मा. सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग श्रीमती प्रांजली सोनवणे यांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक वाघोली पोलीस ठाणे श्री. युवराज हांडे, तपास पथक अधिकारी पोउपनि मनोज बागल, पोलीस अंमलदार बाबासाहेब मोराळे, प्रदिप मोटे, रामचंद्र पवार, समीर भोरडे, दिपक कोकरे, साईनाथ रोकडे, पांडुरंग माने, विशाल गायकवाड, मंगेश जाधव, राजाराम अस्वले, शिवाजी सालके, शिवाजी चव्हाण, प्रितम वाघ यांनी केली.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page