बसमध्ये चोरी करणा-या आरोपीच्या येरवडा पोलीसांनी आवळल्या मुसक्या..!

दि. २७/०५/२०२५ रोजी हद्दीमध्ये पेट्रोलिंग करुन जबरी चोरी गुन्हे उघडकीस आणणेच्या अनुषंगाने मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-४, श्री हिम्मत जाधव, मा. सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग श्रीमती प्रांजली सोनवणे यांनी सुचना दिलेल्या होत्या त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री रविंद्र शेळके यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस अंमलदार विजय अडकमोल व नटराज सुतार यांना बातमी मिळाली एक इसम सोन्याची तुटलेली चैन विक्री करणेसाठी येरवडा बाजारामध्ये आलेला आहे.

सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक येरवडा पोलीस स्टेशन यांना कळविल्याने त्यांनी मिळालेली माहिती वरुन कारवाई करणेबाबत मार्गदर्शन केले त्याप्रमाणे तपास पथकाचे सपोनि रविकांत नंदनवार, श्रेणी पोलीस उप-निरीक्षक प्रदिप सुर्वे व स्टाफ यांनी तेथे जावून संशयीत एक इसमास पळून जात असताना अतिशय शिताफीने पकडले. त्यांचे नाव पत्ता विचारता सुशांत शंकर गायकवाड वय २४ वर्षे रा साईनाथ नगर खराडी पुणे असल्याचे समजले. त्यांचेकडे सखोल चौकशी करता त्याने येरवडा भागामध्ये बसमध्ये दि. २७/०५/२०२५ रोजी सोन्याची चैन चोरी केल्याचे कबूल केले, सदरबाबत फिर्यादी यांच्या गळयातील चैन चोरुन नेलेबाबत येरवडा पो. स्टे. गु. र. नं. ३५३/२०२५ बीएनएस ३०५ अन्वये गुन्हा दाखल आहे. आरोपींकडून गुन्हयातील सोन्याची चैन १,२५,०००/- रु.ची हस्तगत करुन गुन्हा उघडकीस आणला आहे.

Advertisement

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, श्री मनोज पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-४ श्री. हिम्मत जाधव, मा. सहा. पोलीस आयुक्त येरवडा विभाग श्रीमती प्रांजली सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र शेळके, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती पल्लवी मेहेर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. विजय ठाकर येरवडा यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी सपोनि रविकांत नंदनवार, श्रेणी पोउपनि प्रदिप सुर्वे, पोलीस अंमलदार तुषार खराडे, किरण घुटे, सागर जगदाळे, सचिन गवळी, महेंद्र शिंदे, पोअं विशाल निलख, अमोल गायकवाड, भीमराव कांबळे, नटराज सुतार, विजय अडकमोल, बालाजी सोगे, शैलेश वाबळे, संदिप जायभाय, नवनाथ गांगुर्डे यांनी केली.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page