होळी व धुलीवंदन सणाचे अनुशंगाने कारवाई करुन आरोपी यांचेकडुन गावठी हातभट्टी तयार दारुचा मोठा साठा जप्त..!

वानवडी पोलीस स्टेशनची कामगिरी पुणे शहरातील अवैद्य धंदयावर कारवायां करुन त्यांचे समुळ उच्चाटन करुन नियंत्रण ठेवण्यासाठी मा. पोलीस आयुक्त सो, पुणे शहर यांनी आदेश दिल्याने व दिनांक १४/०३/२०२५ रोजी होळी व धुळीवंदनाचे सणाचे अनुशंगाने पुणे शहरात कायदा व सुव्यवस्था राखुन बेकायदेशीर कृत्यास तत्काळ प्रतिबंध करुन, त्यांचेवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे अनुशंगाने वानवडी पोलीस ठाणे अंकीत सुरक्षानगर पोलीस चौकीचे कार्यक्षेत्रात आमचेकडील उपलब्ध खाजगी वेगवेगळया दुचाकी वाहनांवरुन पेट्रोलिंग करीत असताना समर्थनगर हिंगणेमाळा, हडपसर, पुणे येथे आलो असता सुमारे १२/०० वा. चे सुमारास सहा. पोलीस उप निरीक्षक किशोर राणे यांना गोपनिय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, समर्थनगर हिंगणेमाळा रोड, हडपसर, पुणे येथे एक इमस आपले कब्जात तयार हातभट्टीचा दारु विक्री करीत आहे. अशी बातमी मिळाली असता. सदरबाबत वरिष्ठांना कळवुन, वरिष्ठांचे आदेशाने चौकीच्या स्टाफसह छापा कारवाईसाठी लागणाऱ्या साहीत्यासह वरिष्ठानी दिलेल्या सुचनांप्रमाणे आंम्ही पोलीस स्टाफ व पंच असे सदर ठिकाणी जावुन अचानकपणे दुपारी १२/१५ वा छापा टाकुन सदर दारु विक्री करणाऱ्या इसमास आहे त्या परिस्थीतीत पकडुन त्यास त्याचे नाव व पत्ता विचारला असता त्यांने आपले नाव चाँद अमीन सय्यद वय ४८ वर्षे धंदा चालक रा. स.नं. ८९ गल्ली नं. ६ समर्थनगर, हिंगणेमाळा रोड, हडपसर, पुणे असे असल्याचे सांगीतले. त्यावेळी त्याचेहातात असलेली नायलॉनच्या पोत्याची पाहाणी करता त्यामध्ये गावठी हातभट्टीची दारु मिळुन आली त्याबाबत त्यास विचारणा करता सदर दगुरु विक्री करण्याकरीता आणली आहे असे सांगीतले. तसेच सोबत असलेल्या स्टाफने सदर पत्र्याचे शेडच्या आजुबाजुस शोध घेतला असता सदर पत्र्याचे शेडच्या लगत लोखंडी पत्र्याखाली लपवुन ठेवलेले ३५ लिटर मापाची तयार हातभट्टी दारु भरलेली हत्ती कॅन एकुण ०८ नग, त्याचे शेजारी नायलॉनच्या ०३ पोत्यात तयार हातभट्ठीची दारुच्या पारदर्शक छोटया पिशव्यात भरलेली तयार हातभट्टीची दारु व सदर दारु विक्री करणाऱ्या इसमाकडे रोख रक्कम ३१०/- रु असा एकुण ३०,३१०/- रुपये मुद्देमाल मिळुन आल्याने सदर इसमाचे विरुध्द वानवडी पोलीस स्टेशन महाराष्ट्र प्रोव्हिबिशन अॅक्ट कलम ६५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करणेत आलेला आहे. सदरची कारवाई ही, मा.श्री. राजकुमार शिंदे, पोलीस उप-आयुक्त सोो, परिमंडळ ०५ पुणे शहर, श्री धन्यकुमार गोडसे, सहा. पोलीस आयुक्त सोो, वानवडी विभाग, पुणे शहर व श्री सत्यजित आदमने वरीष्ठ पोलीस निरीक्षक, वानवडी पो. स्टे. पुणे शहर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली सुरक्षानगर पोलीस चौकी प्रभारी अविनाश शिंदे पोलीस उप निरीक्षक व सहा पोलीस उप निरीक्षक किशोर राणे व म.पो. अंम. १०८८२ दिवटे, म.पो. अंम. ४२५९ पारधी, यांनी केली आहे. सदर गुन्हयाचा अधिक तपास हे पोलीस उपनिरिक्षक अविनाश शिंदे हे स्वतः करीत आहेत.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page