गडचिरोली पोलीस ठाणेकडील खुनाच्या गुन्ह्यातील संशयीत इसमाचा शोध घेवुन गडचिरोली पोलीसांच्या दिले ताब्यात..!

गडचिरोली पोलीस ठाणेकडील गु.र.नं.२३१/२०२५ भा.न्या.संही. कलम १०३ प्रमाणे दाखल गुन्ह्यातील संशयीत इसम नामे विशाल ईश्वर वाळके हा नरवीर तानाजी वाडी शिवाजीनगर परिसरात असलेबाबत गोपनीय माहिती मिळाली. त्याप्रमाणे सदर बाबत आम्ही मा. पोलीस उप-आयुक्त परि १ यांना कळवुन त्यांचे सुचने प्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. चंद्रशेखर सावंत, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री. चंद्रकांत सुर्यवंशी तपास पथकातील पोलीस अंमलदार प्रमोद मोहिते, चोबे, आहेर, माने, भोसले, हंडगर, सांगवे, गायकवाड असे नरवीर तानाजी वाडी शिवाजीनगर परिसरात जावुन त्याचा शोध घेवुन त्यास ताब्यात घेवुन सहा पोलीस निरीक्षक राहुल आव्हाड स्थानीक गुन्हे शाखा गडचिरोली व पोलीस उप निरीक्षक दिपक चव्हाण यांच्या ताब्यात देण्यात आले.

Advertisement

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री. प्रविणकुमार पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त, परि.१, पुणे श्री. संदीप सिंह गिल्ल, मा. सहा. पोलीस आयुक्त विश्रामबाग विभाग, श्री. साईनाथ ठोंबरे, यांचे सुचने व मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. चंद्रशेखर सावंत, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री. चंद्रकांत सुर्यवंशी तपास पथकातील पोलीस अंमलदार प्रमोद मोहिते, चोबे, आहेर माने, भोसले, हंडगर, सांगवे, गायकवाड शिवाजीनगर पोलीस ठाणे पुणे शहर यांनी केली आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page