काळेपडळ तपास पथकाची धडाकेबाज कामगीरी. आरोपीकडून एकुण ०२ गावठी पिस्टल, ०४ जिवंत काडतूसे जप्त”

चालू असलेल्या सन उत्सोवाच्या अनुषंगाने मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, काळेपडळ पोलीस ठाणे मानसिंग पाटील यांचे आदेशांन्वये काळेपडळ पोलीस ठाणेचे तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक, अमित शेटे, पो.हवा. प्रविण काळभोर, युवराज दुधाळ, दाऊद सय्यद, प्रतिक लाहिगुडे, पोलीस अंमलदार शाहीद शेख, नासीर देशमुख, अतुल पंधरकर, श्रीकृष्ण खोकले, नितीन ढोले, सद्दाम तांबोळी, महादेव शिंदे, असे पो.स्टे. हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पो. अं. नासीर देशमुख यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, काळेपडळ पोलीस स्टेशनचे रेकॉर्डवरील गुन्हेगार इसम नामेः- अजिम ऊर्फ आंटया मोहम्मदहुसेन शेख, वय २५ वर्षे, रा.गल्ली नं. १२, कब्रस्तानसमोर, सय्यदनगर, हडपसर, पुणे हा गौरी हॉटेल जवळ, पालखी मार्ग, हेवणपार्क कडे जाणाऱ्या मधल्या रस्त्याच्या आडबाजूस, महंदवाडी, पुणे येथे संशयितरित्या कोणता तरी दखलपात्र गुन्हा करणेचे उद्येशाने आपले कब्जात काहीतरी संशयित चिजवस्तु आपले जवळ बाळगुन वावरत असुन संशयित चिजवस्तु हि अग्निशस्त्र असण्याची दाट शक्यता आहे. अशी बातमी मिळताच, सदर ठिकाणी सहा. पोलीस निरीक्षक अमित शेटे यानी सदरबाबत मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. मानसिंग पाटील यांना कळविले असता त्यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पो. निरी. अमित शेटे व वरील पोलीस स्टाफ असे गौरी हॉटेल जवळ, पालखी मार्ग, हेवणपार्क कडे जाणाऱ्या मधल्या रस्त्याच्या आडबाजूस, महंदवाडी, पुणे सर्व टिमला दिलेल्यां सुचनांप्रमाणे जावुन सर्वांनी मिळालेल्या माहितीची खात्री केली असतां, रेकॉर्डवरील गुन्हेगार नामे अजिम ऊर्फ आंटया मोहम्मदहुसेन शेख, वय २५ वर्षे, रा.गल्ली नं.१२, कब्रस्तानसमोर, सय्यदनगर, हडपसर, पुणे हा पोलीसांना पाहून संशयितरित्या व कावरे बावरे स्थितीत आढळुन आलेने सर्व टीमने चोहोबाजूने त्यास घेराव घालून ताब्यांत घेतले. त्यावेळी त्यांची दोन पंचा समक्ष अंगझडती घेतली असता त्याच्याकडे ०२ पिस्टल व ०४ जिवंत राऊंड असा एकुण ८१,६००/- रुपयांचा मुद्देमाल मिळुन आला आहे. तरी नमूद इसम अजिम ऊर्फ आंटया मोहम्मदहुसेन शेख याच्यावर भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५) व मुंबई पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) सह १३५ अन्वये काळेपडळ पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून नमूद आरोपीतास अटक करण्यात आली आहे.

Advertisement

सदरची कामगिरी ही हिंमत जाधव, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ४ (अति. कार्य परिमंडळ ५ पुणे शहर) यांचे मार्गदर्शनाखाली धन्यकुमार गोडसे, सहाय्यक पोलीस आयुक्त, वानवडी विभाग

पुणे, मानसिंग पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, काळेपडळ पोलीस स्टेशन, अमर काळंगे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), काळेपडळ पोलीस ठाणे, पुणे शहर, यांचे सुचनेप्रमाणे अमित शेटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, अमित शेटे, पो.हवा. प्रविण काळभोर, युवराज दुधाळ, दाऊद सय्यद, प्रतिक लाहिगुडे, पोलीस अंमलदार शाहीद शेख, नासीर देशमुख, अतुल पंधरकर, श्रीकृष्ण खोकले, नितीन शिंदे, नितीन ढोले, सद्दाम तांबोळी, महादेव शिंदे यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page